पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या फंडातून कुंभोज येते रस्ता कामाचा शुभारंभ-संदेश भोसले
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या फंडातून कुंभोज येते रस्ता कामाचा शुभारंभ-संदेश भोसले
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या विशेष फंडातून कुंभोज येथे दोस्ती फोटो स्टुडिओ परिसरात दहा लाख रुपये च्या रस्ता कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत यांच्या उपस्थितीत व कुंभोज गावच्या सरपंच स्मिता चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला
कुंभोज गावच्या सर्वांगीण विकासासाठी संजय गांधी निराधार कमिटीचे संचालक संदेश भोसले यांच्या माध्यमातून गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात विकास कामांचा फंड उपलब्ध करण्यात आला असून इथून पुढे कुंभोज गावच्या विकासासाठी लागेल तितक्या प्रमाणात फंड देण्याची ग्वाही जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत यांनी बोलताना व्यक्त केली.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कुंभोज ग्रामपचायत व कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने केक कापून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले ,शरद कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले ,वारणा दूध संघाची संचालक अरुण पाटील ,महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी संजय गांधी कमिटीचे संचालक अमोल गावडे, ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे, अनिकेत चौगुले,अमरजीत बंडगर ,लखन भोसले, दाविद घाटगे ,सदाशिव महापुरे, दीपक घोदे, कॉन्ट्रॅक्टर प्रताप जाधव ,नंदकुमार माळी, उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार संजय गांधी निराधार कमिटीचे संचालक संदेश भोसले व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी संदेश भोसले, संदिप तोरस्कर, सुरज पालखे , सज्जद सुतार, पिराजी कोळी, पांडुरंग पालखे, उदय भोसले, राहुल कडकलक्ष्मी, लक्ष्मण चांदरगी, सादिक फरास, रत्नदीप डोणे, प्रशांत कुरणे, सुशांत कोले, निलेश शिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment