स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात म.गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त अभ्यासिकेचे उद्घाटन करून अभिवादन.

 स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात  म.गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त अभ्यासिकेचे  उद्घाटन करून  अभिवादन.

-------------------------------------

रिसोड प्रतिनिधि 

 रणजीत सिंह ठाकुर 

-------------------------------------

 रिसोड: स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय रिसोड येथे महात्मा  गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त  कार्यक्रमाचे  आयोजन  करण्यात  आले होते 

 कार्यक्रमाचे  अध्यक्ष  सेवानिवृत्त प्राचार्य  रामचंद्र जाधव तर प्रमुख  अतिथी  प्राचार्य  डॉ. विनोद  कुलकर्णी  होते. प्रथम  मानवरांच्या  हस्ते  महात्मा  गांधीजी  व लालबहादूर  शास्त्री  यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  अभिवादन करण्यात आले. व प्रमुख  अतिथीच्या  शुभ  हस्ते  अभ्यासिकेचे   फीत  कापुन उद्घाटन  करण्यात आले.

 या प्रसंगी  प्राचार्य  कुलकर्णी  यांनी  माणसाने कर्म  करत  रहावे ते पण विधायक  त्यांचे आपोआप  फळ हे मधुर मिळते  महापुरुषांनी समाज उद्धारासाठी कर्म  केलेत म्हणून आपण आज  त्यांच्या जयंतीनिमित्त  त्यांचे स्मरण  करतो.  युवकानी  ते पण महाराष्ट्रयीन  युवकांनी वाचनाकडे जास्त लक्ष  द्यावे.  प्रशासकीय  सेवेमध्ये महाराष्ट्र  मागे  का आहे? याचा  सगळ्यांनी विचार  करावा.  या अभ्यासकेसाठी काहीतरी  फीस घ्यावी  मोफत  मिळते  त्याचे  महत्त्व  राहत  नाही. इतर पक्षीय आंदोलन  मोर्चे  या पासुन  युवकांनी अलिप्त  राहून  रोजगारांकडे  लक्ष  द्यावे. असे विविध  सोदाहरण  सांगितले.

 या प्रसंगी गांधीजी व शास्त्रीजी  यांच्या जीवनावर  प्रा.डवरे. प्राचार्य  चव्हाण   यांनी  समाजानी   व राजकिय  नेत्यांनी त्यांचा  आदर्श  घ्यावा  असे  सांगितले 

 कार्यकमाचे  प्रस्ताविक वाचनालयाचे संचालक प्राचार्य कमलाकर टेमधरेसर  यांनी तर सुत्रसंचालन  शालिग्राम पठाडे  व आभार प्रदर्शन  प्रा.डाॅ. प्रविण हाडे यांनी  केले 

 गांधीजी  जयंतीनिमित्त  चैतन्य  बानोरे  याने  गांधीचे  पेन्सिलने चित्र  काढून  आगळे वेगळे अभिवादन  केले .

या कार्यक्रमात   डाखोरे सर , बी. के.चव्हाण सर, डाॅ.गटाण्णी, इंगळे सर, प्रा. शरद  टेमधरे  उपस्थित  होते. ग्रंथपाल गजानन  तारापूरे  यांने  कार्यक्रमाचे  नियोजन  केले  होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.