शहर विकासाच्या नावाखाली कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्यांकडून नागरिकांची केवळ दिशाभूल, खासदार धनंजय महाडिक यांचे टिकास्त्र, रूईकर कॉलनीमध्ये सुशोभित केलेल्या मैदानाचे लोकार्पण.

 शहर विकासाच्या नावाखाली कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्यांकडून नागरिकांची केवळ दिशाभूल, खासदार धनंजय महाडिक यांचे टिकास्त्र, रूईकर कॉलनीमध्ये सुशोभित केलेल्या मैदानाचे लोकार्पण.

कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्यांनी विकासाच्या नावाखाली कोल्हापूरच्या नागरिकांची केवळ दिशाभूल केली. मात्र सत्यजीत कदम यांनी गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा नियोजन समिती तसेच विविध निधीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभाग आणि गल्लींमध्ये पायाभूत सुविधांचे जाळे विणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये प्राथमिक सेवा सुविधांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी आणि विकासाचे नवनवीन प्रकल्प राबवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणूकीत सत्यजीत कदम यांच्या पाठीशी नागरिकांनी रहावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. १ कोटी १० लाख रूपयांच्या निधीतून रूईकर कॉलनीतील महाडिक वसाहतीमधील मैदान विकसीत करण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा खासदार महाडिक यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजीत कदम यांच्या प्रयत्नातून आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून रूईकर कॉलनीतील महाडिक वसाहतीमधील मैदान विकसीत करण्यात आले आहे. त्यासाठी १ कोटी १० लाख रूपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या मैदानाचे लोकार्पण खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि सत्यजीत कदम, माजी नगरसेवक राजसिंह शेळके, विजय सुर्यवंशी, सीमा कदम, उमा इंगळे, आशिष ढवळे, वैभव माने, स्मिता माने यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी, माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले. कोल्हापूर शहराच्या विकासाच्या अनेक गप्पा माजी पालकमंत्र्यांनी मारल्या. मात्र प्रत्यक्षात विकासाच्या नावाखाली कोल्हापूरवासियांची फसवणूक आणि दिशाभूल करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात विकासाचे अनेक प्रकल्प आजही प्रलंबित आहेत. मात्र सत्यजीत कदम यांनी, सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत, विकासाच्या विविध प्रकल्पांसाठी पाठपुरावा सुरू ठेवलाय. त्यातूनच कोल्हापूर शहरातील अनेक प्रभागांमध्ये उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. शहरात सेवासुविधांचे  जाळे निमर्ाण होण्यासाठी येत्या विधानसभा निवडणूकीत सर्वांनी सत्यजीत कदम यांच्या पाठीशी रहावे, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. यावेळी सत्यजीत कदम यांनी, या परिसरात झालेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. त्यामध्ये या मैदानाभोवती संरक्षक जाळी मारणे, वॉकींग ट्रॅक तयार करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करणे आणि मैदान सपाटीकरण यासारख्या कामांचा समावेश असल्याचे सत्यजीत कदम यांनी सांगितले. दरम्यान परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मनोगत व्यक्त करताना,  सत्यजीत कदम यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक केले आणि येत्या विधानसभा निवडणूकीत प्रभागातील नागरीक सत्यजीत कदम यांच्या पाठीशी ठामपणेे राहतील, अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमावेळी महावीर गाठ, रूईकर कॉलनी सोसायटीचे अध्यक्ष विजय रोहिडा, प्रशांत घोडके, नितीन पाटील, विजयेंद्र माने यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.