भारतीय संविधान कोणीच बदलू शकत नाही....! संविधानामुळेच भारत देश एकसंघ ; आमदार शामसुंदर शिंदे
भारतीय संविधान कोणीच बदलू शकत नाही....! संविधानामुळेच भारत देश एकसंघ ; आमदार शामसुंदर शिंदे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण आमदार श्यामसुंदर शिंदे व सौ. आशाताई शिंदे यांच्या हस्ते संपन्न.
लोहा शहरात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या क्रांतीसुर्य बौद्ध विहार येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते थाटात करण्यात आले यावेळी भंते पैयाबोधी, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी .एम. वाघमारे, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार सुरेशदादा गायकवाड, जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल मोरे ,काँग्रेस कमिटी नांदेड जिल्हाध्यक्ष बी .आर. कदम, नगरसेवक बबन निर्मले, नगरसेवक बालाजी खिलारे, काँग्रेस तालुका अध्यक्ष शरद पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम धोंडगे, पुतळा समितीच्या अध्यक्षा तथा
स्वागतेच्छुक श्रीमती पुष्पलता शंकरराव कापुरे, रवी कापुरे, अश्विनी कापुरे, भारतीय बौद्ध महासभेचे लोहा तालुका अध्यक्ष बापूसाहेब कापुरे, मोहन काका शूर ,पुंडलिक पाटील बोरगावकर, प्रमुख उपस्थित होते. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांनी भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले, यावेळी व्यासपीठावरून बोलताना आमदार श्यामसुंदर शिंदे म्हणाले की ,भारतीय संविधान एवढं मजबूत व प्रगल्भ असून कोणीही असो बाबासाहेबांचे हे पवित्र संविधान कोणीच बदलू शकणार नाही, भारतीय संविधानामुळेच भारत देश एकसंघ राहिला आहे, बाबासाहेबांचे संविधान जर या देशात नसते तर या देशाचे अनेक तुकडे पडले असते, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून टिकवून ठेवलेल आहे, छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेबांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत, कोणी काहीही केले तरी महापुरुषांचे विचार कदापि पुसल्या जाणार नाहीत, मी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देव मानतो, येणाऱ्या काळात बुद्ध विहारासाठी व पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी बोलताना दिली, लोहा शहरात आज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करताना आम्हाला अत्यंत आनंद होत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच देशात सर्व धर्म समभाव व एकोपा टिकून आहे, बाबासाहेबांचे सामाजिक कार्य अलौकिक असून आजच्या पिढीला बाबासाहेबांचे विचार प्रेरणादायी आहेत ,सर्व समाजाने बाबासाहेबांच्या विचारांचा अवलंब करावा कसे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी बोलताना केले , आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई शिंदे यांच्या माध्यमातून लोहा शहरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे थाटात लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यामुळे तालुक्यात भीम अनूयायासह सर्व समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, या कार्यक्रमास लोहा शहर व परिसरातील महिला भगिनी सह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*चौकट;*
*बाबासाहेबांचा पुतळा बसविण्यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे, आशाताई शिंदे यांचा सिंहाचा वाटा*
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता शंकराव कापुरे बोलताना म्हणाल्या की,मी जवळपास वीस वर्षापासून लोहा शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसण्यासाठी प्रयत्न करत होते, काही वर्षाखालीच पुतळा बसण्यासाठी मान्यता मिळाली होती, पुतळा समितीमध्ये सर्व सदस्य या सर्व महिला आहेत, अनेकांनी मला खूप त्रास दिला, पण लोहा कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्यामसुंदर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी लोह्यात बाबासाहेबांचा पुतळा बसण्यासाठी मोलाची मदत केलेली असून मी त्यांची ऋणी आहे, बाबासाहेबांचा पुतळा बसविण्यासाठी आमदार शामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे पुतळा समितीच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता शंकरराव कापुरे यांनी बोलताना सांगितले.
Comments
Post a Comment