संजय नगरमध्ये 9 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, अत्याचाराची बातमी कळताच संतप्त जमावाकडून आरोपीच्या घराची तोडफोड.
संजय नगरमध्ये 9 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, अत्याचाराची बातमी कळताच संतप्त जमावाकडून आरोपीच्या घराची तोडफोड.
------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
------------------------------------
काही महिन्यापूर्वीच अल्पवयीन मुलीवर घडलेल्या घटनेनंतर आज परत संजयनगर येथे नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या घराची संतप्त नागरिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. तसेच अत्याचार झालेल्या सार्वजनिक शौचालयाची देखील संतप्त झालेल्या जमावाने तोडफोड केली आहे. 28 वर्षीय तरुणाने 9 वर्षाच्या मुलीवर ब्ल्यू फिल्म दाखवून लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर संजयनगर भागातील नागरिक संतप्त झाले होते. आरोपी तरुणास संजयनगर पोलिसांनी अटक करत आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Comments
Post a Comment