पोखरा योजनेत रिसोड तालुक्यातील 27 गावांची निवड पाच वर्ष मिळणार शेतकऱ्यांना विविध योजना चे लाभ.
पोखरा योजनेत रिसोड तालुक्यातील 27 गावांची निवड पाच वर्ष मिळणार शेतकऱ्यांना विविध योजना चे लाभ.
-------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजितसिह. ठाकुर
-------------------------------
नानाजी देशमुख कृषि संजीवनी (आत्मा)योजना जि पोखरा नावाने ओळखली जाते कृषी संजीवनी असलेली तसेच राज्यात सर्वात मोठा कृषी उपक्रम असलेली पोखरा ही योजना भाग दोन महाराष्ट्र शासनाने पुन्हा सुरू केली आहे या योजने मध्ये रिसोड तालुक्यातील 27 गावांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकार कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,शासन निर्णय क्रमांक १४ ऑक्टोबर, २०२४ मध्ये नमूद करण्यात आले आहे की नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वीतेमुळे राज्याच्या इतर जिल्ह्यांमधील गावांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्याची मागणी विचारात घेऊन दिनांक २८ जून, २०२३ रोजीच्या मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार दिनांक ३० जून, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पामध्ये सद्यः स्थितीत समाविष्ट असलेल्या एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजित रु.६९०० कोटी (रुपये सहा हजार नऊशे कोटी) किंमतीच्या जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्यास शासनाची तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्यें रिसोड तालक्यातील केशवनगर पवारवाडी,
वाडी वाकद ,वाकद ,जांबअढाव, कोयळी बु,कोयळी खु,गोवर्धन, नावली, शेलगाव राजगुरे , मसलापेन,,वाघी खु. दापुरी खु. चिचांबा पेन, येवता ,पार्डीतिखे, खडकी ढंगारे, बेलखेडा, हिवरापेन ,येवतती, वारूडतोफा, कोयळी बु.कोयळी खु. व्याड, चिचांबाभर अशा एकूण 27 गावाची पोखरा या योजनेत निवड झाली असल्याने या गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा सतत पाच वर्ष फार मोठा लाभ मिळणार आहे . त्यामध्ये वैयक्तिक आणि सार्वजनिक हिताच्या शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ मिळणार आहे वैयक्तिक मध्ये फळबाग लागवड बांबू लागवड शेडनेट हाऊस, पॉली हाउस, बंदिस्त शेळीपालन कुक्कुटपालन रेशीम उद्योग मधुमक्षिका पालन, गोड्या पाण्यातील मत्स्य पालन, गांडूळ खत, नाडेप युनिट ,शेततळे, ठिंबक तुषार संच एचडीपीई व पीव्हीसी पाईप इलेक्ट्रिक व सबमर्सिबल पंप हाऊस कांदाचाळ या वैयक्तिक लाभाच्या योजना असून सार्वजनिक मध्ये सिमेंट बंधारा ,माती नाला बांध ,नाला खोलीकरण ,ढाळीचे बांध आधीचा समावेश आहे प्रकल्पाच्या टप्पा दोन साठीच्या अंमलबजावणी आराखड्यामध्ये शेती विषयक नवीन संशोधनाचा तंत्र उन्नत शेतीसाठी उपयोग करणे पाण्याचा कार्यक्षम वापरण्यासाठी उपाययोजना करणे व त्यायोगे शेतीमधील गर्भ उत्सर्जन कमी करणे शेतीमध्ये कर्ज ग्रहण वाढवून शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट सुविधा उपलब्ध करण्यासाठी संबंधित व पुनर्जीवित या हवामान शेती तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करून पिकाची उत्पादकता वाढविणे पौष्टिक तृणधान्य उत्पादनावर भर देणे हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी विविध संशोधन संस्थांबरोबर भागीदारी करणे इत्यादी घटकाचा समावेश यामध्ये राहणार असून सदर प्रकल्प अमलबजावणी आराखड्यामध्ये मूळ पर्यावरण पूरक हवामान अनुकूल घटकांचा उजा जमिनीची सुपीकता वाढविणे पोत सुधारणे प्रामुख्याने समावेश करण्यात येणार असल्याचे अंमलबजावणी मध्ये वैयक्तिक सामूहिक शेतीसाठी सामूह बाबीसाठी ऑनलाईन प्रणायचा वापर करावा आदी बाबी नमूद करण्यात आले आहेत *बाॅक्स* रिसोड तालुक्यांमध्ये पोखरा प्रकल्प गेल्या मागील पाच वर्षांपूर्वीच ज्या मंडळातील गावांचा समावेश होता त्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी सोई सुविधा मिळाल्या त्याच पद्धतीने या पुढील पाच वर्षात सुद्धा मिळणार असून शेतकऱ्यांनी शेतकरी बचत गटाद्वारे सामूहिक व व्यक्ती गत लाभाच्या योजना घेऊन शेतीमध्ये प्रगती साधावी. **मदन तावरे कृषी अधिकारी तालुका कृषी विभाग रिसोड*
Comments
Post a Comment