कराड शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी 24 तासात तब्बल 3 कोटीचा दरोडा टाकणाऱ्या टोळीस पकडून त्यांच्याकडुन 2 कोटी एकोणनव्वद लक्ष चवतीस हजार एव्हडी रक्कम हस्तगत केली.

 कराड शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी 24 तासात तब्बल 3 कोटीचा दरोडा टाकणाऱ्या टोळीस पकडून त्यांच्याकडुन 2 कोटी एकोणनव्वद लक्ष चवतीस हजार एव्हडी रक्कम हस्तगत केली.

------------------------------

सातारा जिल्हा प्रतिनिधी

 अमर इंदलकर 

----------------------------

सविस्तर बातमी अशी की फिर्यादी मुंबई पार्टीचे रोख 3 कोटी एव्हडी रक्कम क्रेटा गाडी रजिस्टर नंबर- MH12.M1.6005 मधून मुंबई ते हुबळी अशी घेऊन जात असताना कराड गावच्या हद्दीत कोल्हापूर नाक्यावरून कोल्हापुर बाजूला जात असताना एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट ने पाठलाग करून मलकापूर तालुका हद्दीतील ढेबेवाडी फाट्याच्या पुढे गाडी आडवी मारून स्विफ्ट गाडीतून दोन अज्ञात खाली उतरले तसेच दुचाकी मधून आणखी 2 अनोळखी इसम उतरले यापैकी एकाने हॉकी स्टिकणे क्लीनर साईटची काच फोडली व स्विफ्ट गाडीतील दोन जण स्विफ्टचा दरवाजा उघडून गाडी का दाबली असे म्हणत शिवीगाळ व मारहाण करू लागले,मारहाण करत त्यांनी ड्राइव्हर सीट कडेला असलेल्या मोकळ्या जागेतून फिर्यादीस मागे ढकलून दिले उर्वरित दोघांनी अविनाश यास शिवीगाळ करत मारहाण करत धमकावत गाडी जबरदस्तीने कब्जात घेऊन चाकुचा धाक दाखवत तुम्ही काय काम करता गाडी कचरा पेटीच्या जवळ भरता आम्हाला तुमच्याबद्दल सर्व माहिती आहे, तुमच्याजवळ जे काय आहे ते तुमचे तुम्ही सर्व काढून द्या नाय तर आम्ही काढायला सुरवात केली तर तुमच्यातला एकही जिवंत राहणार नाही असं धमकावून मारहाण करत गाडी गमेवाडी घाटात थांबवून फिर्यादीजवळील 3 कोटी रोख रक्कम काढून घेतली. फिर्यादीच्या डोळ्यास रुमाल पट्टी बांधून रक्कम दुसऱ्या गाडीत ठेवली,ती गाडी तेथून निघून गेली. तदनंतर फिर्यादी यांची गाडी डी मार्ट च्या पुढील बाजूस नांदलापूर गावाजवळ हायवेवर थांबवली त्या नंतर ते सर्व गाडीतून निघून गेले. जाताना फिर्यादीस धमकावून गेले की, येथून पुढे सरळ कोल्हापूरकडे 20km जायचे थांबायचे नाही कुठेच नाय तर जिवंत सोडणार नाही . फिर्यादी हे 5 इसमाविरुद्ध माहिती पोलिसांना देऊ शकले सदर गुन्ह्याचा तपास श्री आर ए ताशीलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर, हे करत होते, टेकनिकल तपासअंती पोलिसांना एक गुन्हेगार सापडला. त्याच्याकडू राहिलेल्या बाकीजनांचे नाव समजले काहींची नावे त्यास माहीत होती काहींची माहिती न्हवती, फिर्यादी यांच्यासोबत असलेला चालक आणि चालक असिस्टंट यांच्याशी आरोपी गटातील महिलेणे संबंध प्रस्थापित करून सर्व माहिती प्राप्त केली होती. आरोपी पुढील प्रमाणे आरोपी (1)आसिफ' सलिम शेख रा. शिंदे गल्ली कराड (2)सुलताना शकील सय्यद रा.मंगळवारपेठ करडी पीराजवळ कराड ता. कराड(3)अजमेर ऊर्फ अज्जु मोहम्मद मांगलेकर रा. अष्टमंगलकार्यालय समोर, गोळेश्वर कार्वेनाका कराड ता. कराड । जि. सातारा (4)नजर महम्मद आरीफ मुल्ला वय 33 वर्षे रा. 262 रविवारपेठ कराड (5)ऋतुराज धनाजी खंडग वय 29 वर्षे रा. तांबवे ता. कराड जि. सातारा (6)ऋषिकेश थनाजी खंडग वय 26 वर्षे रा. तांबवे ता. कराड (7)करीम अजीज शेख वय 35 वर्षे रा. 192 मंगळवारपेठ कराड ता. कराड (8)अक्षय अशोक शिंदे वय 29 वर्षे रा. तामजाई गल्ली तांबवे ता. कराड सातारा(9)नजीर बालेखान मुल्ला वय 33 वर्षे रा. राजीवनगर सैदापुर कराड ता. कराड (10)शैलेश शिवाजी घाडगे वय 24वर्षे रा. निमासोड ता. खटाव जि. सातारा 11. अविनाश संजय घाडगे वय 29 वर्षे रा. निमासोड ता. खटाव जि. सातारा हे आरोपी निष्पन्न करुन नमुद आरोपी यांचे कडुन गुन्हयातील जबरी चोरी केलेली रक्मम 2,89,34,000/- हजार रुपये एवढी रक्कम आज पावेतो हस्तगत करण्यात आली असून आरोपी यांनी वापरलेले वाहने स्विफ्ट गाडी, इनोव्हा, सियाज तसेच HF डिलक्स, जुपीटर, अशी जप्त करण्यात आलेली आहेत. नमुद आरोपी यांची दिनांक 22/10/2024 रोजी पर्यंत पोलीस अभिरक्षा मंजुर करण्यात आलेली असुन सदर आरोपी यांचे कडे तपास सुरु आहे.


सदरची कामगिरी-समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा,श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, अमोल ठाकुर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड व आर.ए. ताशिलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे, श्री. अरुण देवकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बधे, सपोनि फारणे, सपोनि. तारु, सपोनि भापकर, सपोनि, माळी, मसपोनि जाधव, मसपोनि आवंले, मसपोनि. वाघमोडे, मपोउपनि. शितल माने, पोलीस उपनिरीक्षक, शिगाडे, डिसले, पोउपनि भंडारे, पोउपनि मगदुम, अशोक वाडकर, अमोल सांळुखे, सपना सांळुखे, राजेद्र गायकवाड, मपोहवा पुष्पा चव्हाण, पोलीस नाईक अनिल स्वामी, संदीप कुभार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, पो.शि. संदीप शेडगे, आनंदा जाधव, धीरज कोरडे, महेश शिंदे, अमोल देशमुख, दिग्विजय सांडगे, मोहसिन मोमिन, संग्राम पाटील, सागर भोसले, विजय गुरव, दिपक सांळुखे, आकाश मुळे, अमित चव्हाण, संजय गायकवाड कपील आगलावे, शितल गवळी, महिला पोलीस सोनाली पिसाळ, स्थागुशा सातारा यांचे कडील शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, गणेश कापरे, मुनीर मुल्ल्ला, लक्ष्मण जगधने अमित माने, मोहन पवार, स्वप्नील दौंड, शिवाजी भिसे, स्वप्नील कुंभार, शिवाजी गुरव, पृथ्वीराज जाधव

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.