20 ते 30 हजार मताने के पी पाटील निवडून येणार जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे.
20 ते 30 हजार मताने के पी पाटील निवडून येणार जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे.
------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------
राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघांमध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पेक्षा 20 ते 30 हजार मतांनी केपी पाटील निवडून आणण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आव्हान कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांनी माजी आमदार की पी पाटील यांचा उमेदवार अर्ज भरून प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना केले
विजय देवणे पुढे म्हणाले की राधानगरी तालुक्यातील धामणी खोऱ्यातील लोकांना मुख्यमंत्री आणून धामणी धरणामध्ये पाणी आणून विकास करणार अशी घोषणा आमदार नी केली पण ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही व त्याचे टेंडर ही प्रसिद्ध झाले अशी फसवणूक आमदारांनी त्या भागातील जनतेची केली आहे असा आरोप विजय देवणे यांनी केला आहे
के डीसी बँकेचे संचालक ए वाय पाटील हे माझे मेव्हणे असून ते माझ्या पाठीशी उभे राहतील व मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास माजी आमदार उमेदवार के पी पाटील यांनी आज जाहीर सभेत बोलताना कार्यकर्त्यांना सांगितले
यावेळी बिद्रीचे संचालक राजेंद्र भाटळे धनाजी देसाई भिकाजी एकल मधुकर देसाई सुनील कांबळे शेखर देसाई बाळ जाधव जगदीश पाटील सुनील शिंदे शामराव देसाई हिंदुराव चौगुले किसन चौगुले संभाजी पाटील राजेंद्र पाटील इत्यादी राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघातील कार्यकर्ते हजर होत
Comments
Post a Comment