सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका परिसरातील गोवंशिय जनावरांची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या 04 इसमांच्या टोळीला सातारा पोलिसांनी केले तडीपार.

 सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका परिसरातील गोवंशिय जनावरांची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या 04 इसमांच्या टोळीला सातारा पोलिसांनी केले तडीपार.


----------------------------------------

सातारा जिल्हा प्रतिनिधी

अमर इंदलकर 

----------------------------------------




सातारा जिल्ह्यातील फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख (1) तौफिक इम्तियाज कुरेशी (2)इलाही हुसेन कुरेशी (3)अरबाज इम्तियाज कुरेशी (4) इनायत हुशेन कुरेशी सर्व राहणार - कुरेशीनगर मंगळवार पेठ फलटण तालुका, जिल्हा सातारा. यांना संपूर्ण सातारा जिल्ह्यातून 2 वर्षे तडीपार करण्यात आले असून त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा)अधिनियम 1995 व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 हे कायदे लागू असताना तसेंच गोवंशिय जनवारांची कत्तल-वाहतूक करताना मिळून आल्याने व त्यांच्यावर सातत्याने गुन्हे दाखल असल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. सुनिल महाडीक, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. राहुल आर धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग फलटण यांनी

केली होती.

सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांच्या गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे फलटण तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामान्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

पोलीस अधीक्षक समीर शेख, हद्दपार प्राधिकरण पोलीस अधीक्षक सातारा. यांनी सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्द‌पारीचा आदेश पारीत केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे ३१ उपद्रवी टोळयांमधील १०० इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे २८ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०३ इसमांना असे एकुण १३१ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असून एमपीडीए कायदयाअंतर्गत १ इसमावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून भविष्यातही सातारा जिल्हयामधील

सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी,मोक्का,एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती वैशाली कडूकर,अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा.प्रमोद सावंत, अमित सपकाळ,पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पो.हवा वैभव सुर्यवंशी,पोना श्रीनाथ कदम यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.