Posts

Showing posts from October, 2024

बाबासाहेब धाबेकर विद्यालय केशवनगरची विद्यार्थीन सरस्वती धबडघाव राज्यस्तरावर.

Image
  बाबासाहेब धाबेकर  विद्यालय केशवनगरची विद्यार्थीन सरस्वती  धबडघाव राज्यस्तरावर. ------------------------------  रिसोड प्रतिनिधी  रणजीत सिंह ठाकुर  ------------------------------   महाराष्ट्र राज्य संचालनालय पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या तर्फ घेण्यात आलेल्या विभागस्तरीय शालेय मैदानी क्रिडा रिसोड तालुक्यातील बाबासाहेब धाबेकर विद्यालय केशवनगर ता रिसोड ची विद्यार्थीनी सरस्वती बालाजी धबडघाव थाळीफेक प्रकारात  १९ वयोगटात वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरावर झेप घेतली आहे. नेहरू क्रीडा संकुल, बुलढाणा येथे विभागस्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बुलढाणा येथे १९ वर्ष वयोगटातील स्पर्धेचे 25 ऑक्टोबर १९ वर्ष वयोगटात कु. लक्ष्मी धबडघाव ही थाळीफेक प्रकारात द्वितीय क्रमांक (सिल्व्हर) घेऊन विभागीय स्पर्धेत द्वातीय क्रमांक मिळवून राज्यस्पर्धेकरिता पात्र ठरली आहे याबद्दल सरस्वती बालाजी धबडघाव हिचे खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. हिच्या विजयासाठी सोनाजी इंगळे यांनी मेहनत घेतली...

"रिसोड तालुक्यातील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात पक्षप्रवेश"

Image
 "रिसोड तालुक्यातील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात पक्षप्रवेश" ------------------------------  रिसोड प्रतिनिधी रणजितसिह. ठाकुर. ------------------------------   रिसोड येथील विश्व लाॅन येथे काल पक्षप्रवेश झाला. सध्या स्थितीत महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा  रिसोड  मतदार संघात उमेदवार नसतांना सुद्धा रिसोड तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर विश्वास ठेवून शिवसेनेचे वाशिम जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख डॉ. सुधीर कव्हर, जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड विधानसभेचे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विश्वनाथ सानप, उपजिल्हाप्रमुख डॉ.चंद्रशेखर देशमुख, महाविकास आघाडीचे समन्वयक बाळासाहेब देशमुख यांचे हस्ते शहरातील आशिष महाराज लोथे, राजूभाऊ डांगे, अशोकभाऊ इंगळे, अजय चतरकर, संllmlllmmmm? L)llतोष मुळे, अनिलभाऊ राजूरकर, मदन शिंदे, सदानंदaaaall काळे, गोपाल माळेकर, गजानन रासकर, अभिषेक वाघ, प्रदीप देशमुख, रवी मस्के, ओंकार राजुरकर, गजानन पवार, श्रीराम पवार, गोपाल काळे,...

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचेअध्यक्ष ललित गांधी यांचा सत्कार.

Image
  जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचेअध्यक्ष ललित गांधी यांचा सत्कार. --------------------------------------------- कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे --------------------------------------------- फोटो - जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा सत्कार करताना नितीन धुत, श्रीवल्लभ बांगड, लालचंद गट्टाणी, फैयाज गैबान, मयुर शहा, रामुशेठ मुंदडा, नंदकिशोर भुतडा आदी मान्यवर. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांची जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या  अध्यक्ष (राज्यमंत्री पद दर्जा) पदी निवड झालेबद्दल जिल्हा माहेश्‍वरी सभेचे अध्यक्ष नितीन धुत, ट्रस्टी प्रमुख श्रीवल्लभ बांगड, लालचंद गट्टाणी, महेश सेवा समितीचे अध्यक्ष नंदकिशोर भुतडा, उद्योगपती रामुशेठ मुंदडा, बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचे अध्यक्ष फैयाज गैबान, क्रेडाई प्रेसिडेंट मयूर शहा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. जैन समाजासाठी वेगळे आर्थिक विकास महामंडळ स्थापन्याची मागणी सातत्याने केली जात होती. या संदर्भा...

डॉक्टर राहुल आवाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित.

Image
  डॉक्टर राहुल आवाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित. ----------------------------------- कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ----------------------------------- इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित भव्य नामांकन रॅलीमध्ये भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि इचलकरंजीवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता इचलकरंजी विधानसभेमध्ये विजयाचा गुलाल भाजपाच उधळणार, पुन्हा एकदा कमळ फुलणार हा विश्वास अधिक दृढ झाला आहे.* *आज महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. राहुल प्रकाश आवाडे  यांनी प्रांत कार्यालय, इचलकरंजी येथे भाजपा विधानसभेच्या निरीक्षक आमदार सौ. शशिकला जोल्ले, आमदार मा.श्री. प्रकाशआण्णा आवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी सौ. मोसमी चौगुले यांच्या कडे दाखल केले.* यावेळी खासदार मा.श्री. धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, आवाडे कुटुंबातील सदस्य, भाजपा ग्रामीण ...

दृढ इच्छा शक्ती ने यश प्राप्त होते : गोविंद सदामते.

Image
  दृढ इच्छा शक्ती ने यश प्राप्त होते : गोविंद सदामते. -------------------------------- वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  -------------------------------- वाई दि. २४ : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथे वाणिज्य व व्यवस्थापन विभाग व स्कोप हाय यांच्या संयुक्त विद्यमाने “प्री प्लेसमेंट इंडक्शन प्रोग्राम” चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्कोप हाय चे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री  गोंविद सदामते यांनी विद्यार्थ्यांना  विविध कंपन्यांमध्ये संधी मिळवण्यासाठी कोणकोणते कौशल्य  आवश्यक आहेत  या विषयावर मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य   डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य प्रो. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य  श्री  भिमराव पटकुरे व विज्ञान शाखेचे उपप्राचार्य  डॉ. हनुमंत कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपले विचार मांडताना श्री सदामते म्हणाले, आजच्या काळात विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर राहणे आवश्...

20 ते 30 हजार मताने के पी पाटील निवडून येणार जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे.

Image
  20 ते 30 हजार मताने के पी  पाटील निवडून येणार जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे. ------------------------------ राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------ राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघांमध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पेक्षा 20 ते 30 हजार मतांनी केपी पाटील निवडून आणण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आव्हान कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांनी माजी आमदार की पी पाटील यांचा उमेदवार अर्ज भरून प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना केले विजय देवणे पुढे म्हणाले की राधानगरी तालुक्यातील धामणी खोऱ्यातील लोकांना मुख्यमंत्री आणून धामणी धरणामध्ये पाणी आणून विकास करणार अशी घोषणा आमदार नी केली पण ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही व त्याचे टेंडर ही प्रसिद्ध झाले अशी फसवणूक आमदारांनी त्या भागातील जनतेची केली आहे असा  आरोप विजय देवणे यांनी केला आहे के डीसी बँकेचे संचालक ए वाय पाटील हे माझे मेव्हणे असून ते माझ्या पाठीशी उभे राहतील व मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास माजी आमदार ...

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे धृतराष्ट्र.

Image
  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे धृतराष्ट्र. ---------------------------------- मिरज तालुका  प्रतिनिधी  राजू कदम ---------------------------------- *रोहित पवार यांचा हल्लाबोल : 'तासगाव - कवठेमहांकाळ'साठी रोहित पाटील यांचा शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल.          महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यावर गुजरातची पट्टी आहे. ते गुजरातच्या नेत्यांना खुश करत आहेत. त्यांचे गृहखात्यावर लक्ष नाही. राज्यात दडपशाही वाढली आहे. त्यामुळे फडणवीस हे महाराष्ट्राचे धृतराष्ट्र आहेत, असा हल्लाबोल कर्जत - जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला.        तासगाव - कवठेमहांकाळ मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून रोहित पाटील यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तासगाव शहरातून रॅली काढून सभा घेण्यात आली. यावेळी रोहित पवार बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, अनिता सगरे, सुरेश पाटील, स्मिता पाटील, हणमंत देसाई, शंकर पाटील, ताजुद्दीन तांब...

वसुली संस्थेचा आत्मा तर प्रशिक्षण काळाची गरज*:- नानासाहेब रूपनवर.

Image
वसुली संस्थेचा आत्मा तर प्रशिक्षण काळाची गरज*:-  नानासाहेब रूपनवर. मेढा :- महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे, गुलाबराव पाटील प्रशिक्षण संस्था सांगली यांचे वतीने विकास सोसायटी चे सचिव यांचे प्रशिक्षण जावळीची राजधानी मेढा येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मेढा येथील नवीन इमारतीत  संपन्न झाले त्यावेळी जावळीचे सहाय्यक निबंधक नानासो  रूपनवर म्हणाले संस्था सुस्थितीत ठेवायची असेल तर संस्थेने सभासदांना दिलेत्या कर्जाची वसुली वेळेत होणे महत्वाचे आहे कारण वसुली हा संस्थेचा आत्मा आहे तसेच संस्थेचे कर्मचारी व संचालक मंडळ प्रशिक्षीत असणे काळाची गरज आहे  सहकार तज्ञ प्रा दंडवत म्हणाले सचिव हा संस्थेचा कणा आहे त्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे आहे  संस्थेने कर्ज वाटपा सोबत व्यवसायीक होणे  गरजेचे आहे  त्यासाठी संस्थेने विविध व्यवसाय करावे  . संस्थेचा N PA कमी कसा येईल याकडे संस्थेने पाहीले पाहीजे .  विभागीय विकास अधिकारी राजेंद्र निकम यांनी सर्वांचे स्वागत केले   विकास अधिकारी एजाज बागवान, जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ बेलोशे, तालुका अध्यक्ष अनिल धनाव...

कोल्हापूर परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यातील मोठया जुगार अड्डयावर मोठी धाड.

Image
  कोल्हापूर परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यातील मोठया जुगार अड्डयावर मोठी धाड. --------------------------------------  मिरज तालुका प्रतिनिधी  राजू कदम --------------------------------------      उमदी पोलीस ठाणे हद्दीतील को. बोबलाद जुगार अड्डा मोठी कारवाई. *एकूण आरोपी संख्या - 41*          *एकूण हस्तगत रोख रक्कम - 19,36,750/-*                            * हस्तगत मोबाईल - 42*           एकूण जप्त वाहने - चार चाकी वाहने तीन व दुचाकी वाहने दोन.         *असा  मुद्देमाल - 48,95,550/-(अक्षरी- आट्ठेचालीस लाख पंच्यान्नव हजार पाचशे पन्नास रुपये)*              *सदर गुन्ह्यातील नमूद मुद्देमाल हा पुढील कारवाईसाठी पंचनाम्यासह प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिला आहे.*              ...

कराड शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी 24 तासात तब्बल 3 कोटीचा दरोडा टाकणाऱ्या टोळीस पकडून त्यांच्याकडुन 2 कोटी एकोणनव्वद लक्ष चवतीस हजार एव्हडी रक्कम हस्तगत केली.

Image
  कराड शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी 24 तासात तब्बल 3 कोटीचा दरोडा टाकणाऱ्या टोळीस पकडून त्यांच्याकडुन 2 कोटी एकोणनव्वद लक्ष चवतीस हजार एव्हडी रक्कम हस्तगत केली. ------------------------------ सातारा जिल्हा प्रतिनिधी  अमर इंदलकर  ---------------------------- सविस्तर बातमी अशी की फिर्यादी मुंबई पार्टीचे रोख 3 कोटी एव्हडी रक्कम क्रेटा गाडी रजिस्टर नंबर- MH12.M1.6005 मधून मुंबई ते हुबळी अशी घेऊन जात असताना कराड गावच्या हद्दीत कोल्हापूर नाक्यावरून कोल्हापुर बाजूला जात असताना एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट ने पाठलाग करून मलकापूर तालुका हद्दीतील ढेबेवाडी फाट्याच्या पुढे गाडी आडवी मारून स्विफ्ट गाडीतून दोन अज्ञात खाली उतरले तसेच दुचाकी मधून आणखी 2 अनोळखी इसम उतरले यापैकी एकाने हॉकी स्टिकणे क्लीनर साईटची काच फोडली व स्विफ्ट गाडीतील दोन जण स्विफ्टचा दरवाजा उघडून गाडी का दाबली असे म्हणत शिवीगाळ व मारहाण करू लागले,मारहाण करत त्यांनी ड्राइव्हर सीट कडेला असलेल्या मोकळ्या जागेतून फिर्यादीस मागे ढकलून दिले उर्वरित दोघांनी अविनाश यास शिवीगाळ करत मारहाण करत धमकावत गाड...

राधानगरी ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचा मुलगा लेखक म्हणून जन्माला येतो प्राध्यापक डॉक्टर नितीन जरंडीकर.

Image
  राधानगरी ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचा मुलगा लेखक म्हणून जन्माला येतो प्राध्यापक डॉक्टर नितीन जरंडीकर. ------------------------------  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------  राधानगरी ग्रामीण भाग असून या भागातील गरीब शेतकऱ्याचा मुलगा लेखक म्हणून जन्माला येतो असे मत राधानगरी महाविद्यालय इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर नितीन जरंडी कर यांनी यांनी राधानगरी महाविद्यालयामध्ये एन एस एस सांस्कृतिक कार्यक्रम विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य अभिषेक सोहळा भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन असा संयुक्त कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले प्रथम राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विश्वास पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्राध्यापक बी के पाटील ग्रंथपाल प्राके एम कुंभार प्राध्यापक ए  एम कांबळे प्राध्यापक सुनील सावंत प्राध्यापक धनश्री कनोजे प्राध्यापक आयेशा पटेल प्राध्य...

मामुर्डी येथे क्रीडा शिक्षकांचे तालुकास्तर प्रशिक्षण संपन्न

Image
  मामुर्डी येथे क्रीडा शिक्षकांचे तालुकास्तर प्रशिक्षण संपन्न  मेढा :- जावळी तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचे तालुकास्तर प्रशिक्षण श्री केदारेश्वर क्रीडांगण मामुर्डी येथे संपन्न झाले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धांमध्ये यावर्षी पासिंग बाॅल व थ्रो बाॅल हे खेळ नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत.या नवीन समाविष्ट खेळांचे प्रशिक्षण शिक्षकांना देणे आवश्यक होते. त्यानुसार जावलीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी हे प्रशिक्षण मामुर्डी येथे घेण्याचे नियोजन केले.      शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी येथे जावली तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचे तालुकास्तर प्रशिक्षण संपन्न झाले.या प्रशिक्षणाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद दळवी यांचे हस्ते  झाले.प्रास्ताविक क्रीडा समन्वयक शशिकांत गोडसे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबर खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.आपण सर्वजण मिळून या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडू असे आवाहन करणेत आले, मामुर्डी शाळा स्पर्धांसाठी नेहमी सहकार्य करत असल्याबद्दल मामुर्डी शाळेचे आभा...

कोवाड महाविद्यालयामध्ये एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.

Image
  कोवाड महाविद्यालयामध्ये एक दिवसीय कार्यशाळा संपन्न. ------------------------------------- चंदगड प्रतिनिधी  आशिष पाटील  ------------------------------------- कोवाड ( चंदगड ): कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये दि.1६ रोजी इंग्रजी विभागाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एम.एस.पवार होत्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री. संजय पाटील (ग्रामीण सेवा केंद्र संचालक महाराष्ट्र राज्य) हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शासनामार्फत मिळणाऱ्या विविध स्कॉलरशिप याची माहिती दिली. त्यामध्ये 'कोटक कन्या योजना', 'लखपती दीदी योजना', 'ई सारथी ई वहन योजना', 'टाटा पंख स्कॉलरशिप', मागेल त्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप तसेच घरी राहून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना 'वर्क फ्रॉम होम' योजना 'निती आयोग, विक्रम साराभाई' योजना 'मुख्यमंत्री युवा योजना' श्रम आणि रोजगार यासारख्या महाराष्ट्र शासनाने CSR (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलीटी) योजने अंतर्गत सर्व माहिती दिली. बाहेर देशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शास...

सांगली जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय मनपा व ग्रामीण शालेय मैदानी स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ स्पोर्ट्स बामणोली च्या खेळाडूंचा कोल्हापूर येथे निवड.

Image
  सांगली जिल्हा क्रीडा संकुल  येथे  झालेल्या जिल्हास्तरीय मनपा व ग्रामीण शालेय मैदानी स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ स्पोर्ट्स बामणोली च्या खेळाडूंचा कोल्हापूर येथे निवड.  ------------------------------------  मिरज तालुका प्रतिनिधी  राजू कदम ------------------------------------ 20 जणांची  कोल्हापूर विभगीय स्पर्धे साठी निवड या स्पर्धेत 14 सुवर्ण पदक🥇,6राजतपदक🥈1 कांस्य🥉 19 वर्ष गट 1)आदित्य चौगुले- बाम्बू उडी प्रथम( ग्रामीण)(2)प्रतीक घुटुकडे  -उंच उड़ी( प्रथम)ग्रामीण  )17 वर्ष 1) साहिल साबले- उंच उड़ी (प्रथम) मनपा, 2)सुयोग सोलंकर -बांबू उडी    (प्रथम)मनपा 3)समीक्षा तोडकर -बांबू उडी( प्रथम )मनपा 4) ऋतुज माने-चालने (प्रथम,)मनपा5) कावेरी खांडेकर -उंच उडी (प्रथम) मनपा 6)सुरज कुशवाह-चालणे( दुतीय)ग्रामीण)7)प्रियंका कुशवाह -चालने (दुतीय)8) आर्यन मलमे -चालणे (प्रथम) मनपा 9) साहिल कांबळे -चालने (दुतीय)मनपा10) ऋषिका सौदी हातोडा फेक (प्रथम)मनपा 11)प्रणती बॅकोड- हातोडा फेक,थाली फेक( (द्वितीय) मनपा 12)माया कोठे -100 अडथळा (दुतीय) मनपा    ...

अश्विन पौर्णिमेनिमित्त मंदाताई वाघमारे* *यांच्या घरीभोजनदान.

Image
  अश्विन पौर्णिमेनिमित्त  मंदाताई वाघमारे* *यांच्या घरीभोजनदान. ------------------------------------   रिसोड प्रतिनीधी   रणजितसिह. ठाकुर. -------------------------------------  रिसोड: भारतीय बौद्ध महासभेच्या  जिल्हा सरचिटणीस तथा  केंद्रीय शिक्षिका  आयुनी.मंदाताई वाघमारे  व सुजाताताई खरात  यांनी  आषाढ पौर्णिमे पासुन  वर्षावास  काळात  उपोसथ  केले. त्याचा  समारोप  अश्विन पौर्णिमेनिमित्त  मंदाताई वाघमारे  यांच्या निवासस्थानी  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तिना पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्रिशरण पंचशील,बुद्ध  पुजा व परित्राण  पाठ  घेण्यात  आला , अश्विन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष  तथा  केंद्रीय शिक्षक शालिग्राम  पठाडे  यांनी   बौद्ध  धम्मात  अश्विन  पौर्णिमेचे महत्व, वर्षावास व  उपोसथाचे महत्त्व  सांगितले.  ...

पोखरा योजनेत रिसोड तालुक्यातील 27 गावांची निवड पाच वर्ष मिळणार शेतकऱ्यांना विविध योजना चे लाभ.

Image
  पोखरा योजनेत रिसोड तालुक्यातील 27 गावांची निवड पाच वर्ष  मिळणार शेतकऱ्यांना विविध योजना चे लाभ. -------------------------------  रिसोड प्रतिनिधी रणजितसिह. ठाकुर -------------------------------  नानाजी देशमुख कृषि संजीवनी (आत्मा)योजना जि पोखरा नावाने ओळखली जाते कृषी संजीवनी असलेली तसेच राज्यात सर्वात मोठा कृषी उपक्रम असलेली पोखरा ही योजना भाग दोन महाराष्ट्र शासनाने पुन्हा सुरू केली आहे  या  योजने मध्ये रिसोड तालुक्यातील 27 गावांची निवड करण्यात आली आहे.         महाराष्ट्र सरकार कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,शासन निर्णय क्रमांक १४ ऑक्टोबर, २०२४ मध्ये नमूद करण्यात आले आहे की नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वीतेमुळे राज्याच्या इतर जिल्ह्यांमधील गावांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्याची मागणी विचारात घेऊन दिनांक २८ जून, २०२३ रोजीच्या मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार दिनांक ३० जून, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पामध्ये सद्...

स्व. रामभाऊ टेमधरे स्मुर्ती तीन व्यख्यानमाला शुक्रवारपासून.

Image
 स्व. रामभाऊ टेमधरे स्मुर्ती तीन व्यख्यानमाला शुक्रवारपासून. -------------------------------  रिसोड/प्रतिनिधी  रणजीत सिंह ठाकुर -------------------------------  .-स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाच्या विद्यमाने आयोजित तीन दिवशीय स्व. रामभाऊ टेमधरे स्मुर्ती व्याख्यानमालेची सुरुवात 18 ऑक्टोबर शुक्रवार पासून सायंकाळी ठीक 5:30 वाजता स्थानिक स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय रिसोड येथे होणार आहे.स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक प्रा. कमलाकर टेमधरे यांनी वडिलांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ ही व्याख्यानमाला सुरु केली असून यावर्षी यशस्वीपणे सदोतीस वर्षे पूर्ण होत आहेत.या व्याख्यानमालेला महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंतांनी हजेरी लावली आहे. प्रा. कमलाकर टेमधरे वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.वैचारिकदृष्ट्या समाजमन सुदृढ व निरोगी राहावे यासाठी व्याख्यानमाला व तत्सम ज्ञानी लोकांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरते. यासाठी सतत 37 वर्षांपासून वाचकांच्या व श्रोत्याच्या सेवेत व्याख्यानमाला समर्पित आहे.18 ऑक्टोबर पास...

शहा विद्यामंदिर बाहुबली मध्ये वाचन प्रेरणा दिन, माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांची जयंती व जागतिक हात धुवा दिन कार्यक्रम संपन्न.

Image
  शहा विद्यामंदिर बाहुबली मध्ये वाचन प्रेरणा दिन, माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांची जयंती व जागतिक हात धुवा दिन कार्यक्रम संपन्न. --------------------- कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे -----------------------        एम.जी. शहा  विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज, बाहुबली येथे मंगळवार दि. 15 ऑक्टोंबर रोजी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची जयंती, वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.        या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे हे होते. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मंगलाचरण सादर केले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन संपन्न झाले. प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलाजे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले व प्रास्ताविका मध्ये वाचनाचे महत्त्व तसेच हात धुण्याचे फायदे यांची माहिती सांगितले. विद्यार्थी मनोगतामध्ये अभिनंदन पाटील यांनी वाचनाचे महत्त्व या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले तर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या वेशभूषेमध्ये आदेश निर्वाणे याने मी अब्दु...

सात लाख मे.टन गाळप उदिष्ट गाठणार - चंद्रदिप नरके.

Image
सात लाख मे.टन गाळप उदिष्ट गाठणार - चंद्रदिप नरके. ----------------------------------- पन्हाळा प्रतिनिधी  आशिष पाटील  ----------------------------------- कुंभी कासारी साखर कारखाना २०२४/२५ बॉयलर अग्नी प्रदिपण समारंभ. कुंभी कासारी साखर कारखान्याने एक रक्कमी उच्चांकी एफआरपी,तोडणी वहातूक बीले व इतर देणी देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यामुळे सभासद,बिगर सभासद शेतकऱ्यांचा विश्वास कायम राहिला आहे.मागील वर्षी यामुळेच सात लाख ऊस गाळप उदिष्ट गाठले आहे. यावर्षी महापूर व अतिवृष्टी यामुळे ऊस उत्पादनात घट होणार असली तरी शेतकऱ्यांच्या विश्वासावर याही वर्षी सात लाख गाळप उद्दिष्ट गाठणार असल्याचे अध्यक्ष माजी आ. चंद्रदिप नरके यांनी सांगितले    कुंभी कासारी कारखान्याच्या  २०२४/२५ हंगामातील  बॉयलर अग्नीप्रदीपन संचालक सर्जेराव हुजरे व त्यांच्या सुविद्य पत्नी इंदूबाई हुजरे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर पत्रकार परिषदेत माजी आ.चंद्रदीप नरके बोलत होते.उपाध्यक्ष राहूल खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.    यावेळी नरके म्हणाले एकरक्कमी एफआरपी वेळेत देण्याची परंपरा कुंभी कास...

म्हाळेवाडी येथे नवरात्र उत्सव व दसरा: होम मिनिस्टर स्पर्धेत खेळ पैठणीचा, सन्मान नारीचा.सौ.संध्या कांबळे ठरल्या पैठणीच्या माणकरी.तांबडे परिवाराचा अनोखा उपक्रम.

Image
  म्हाळेवाडी येथे नवरात्र उत्सव व दसरा: होम मिनिस्टर स्पर्धेत खेळ पैठणीचा, सन्मान नारीचा.सौ.संध्या कांबळे ठरल्या पैठणीच्या माणकरी.तांबडे परिवाराचा अनोखा उपक्रम. ------------------------------- चंदगड प्रतिनिधी  आशिष पाटील  ------------------------------- म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे नवरात्र उत्सव व दसरा उत्सवाच्या निमित्ताने आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा - खेळ पैठणीचा, सन्मान नारीचा हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या स्पर्धेत महिलांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला आणि आपल्या कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. स्पर्धेचे उद्घाटन सौ. अनुसया दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवर भगिनींमध्ये सौ. श्रीमंता तानाजी पाटील, सौ. सुशिला रामचंद्र पाटील, जना दतू पाटील, अनुसया शिवाजी पाटील, आनंदी पांडूरंग पाटील, शांता कृष्णा पाटील, आणि आंबाका मारुती पाटील यांचा समावेश होता. स्पर्धेमध्ये सहभागी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये तळ्यात-मळ्यात, स्ट्रॉ खोप्यात घालण, फुगे फोडणे, चिमटे लावणे,केळी खाणे, ग्लास मनोरा करणे,...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना अमरावती यांच्या विविध मागण्या संदर्भात जळगाव येथे बेमुदत साखळी उपोषणाला महाराष्ट्र विभागीय कार्यालय कोल्हापूर या शाखेचे वतीने जाहीर पाठिंबा.

Image
  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना अमरावती यांच्या विविध मागण्या संदर्भात जळगाव येथे बेमुदत साखळी उपोषणाला महाराष्ट्र विभागीय कार्यालय कोल्हापूर या शाखेचे वतीने जाहीर पाठिंबा. ------------------------------- राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना कोल्हापूर या शाखेच्या वतीने जळगाव येथे चालू असलेल्या विविध मागण्या संदर्भात साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा या बैठकीत देण्यात आला      या बैठकीमध्ये शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या विविध मागण्या निवडणूकपूर्वी सोडवून नाय लवकरात लवकर द्यावा अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा या बैठकीत देण्यात आला या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष जयवंतराव घोरपडे संघटनेचे दिवाण उप अभियंता शिवाजी हरेर संघटनेचे सचिव धनाजी चव्हाण इत्यादी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते संघटनेचे संचालक चंद्रकांत नरके यांनी शेवटी आभार मानले

किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

Image
  किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.  ----------------------------------- वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  ---------------------------------- येथील किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय देशभक्त आबासाहेब वीर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे हे ४४ वे वर्ष होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे, पर्यवेक्षक श्री. अर्जुन जाधव,स्पर्धा समिती समन्वयक सौ. गौरी पोरे इ. मान्यवरांच्या हस्ते देशभक्त आबासाहेब वीर आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व स्वर्गीय प्रतापराव (भाऊ) भोसले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. स्पर्धकांना वक्तृत्व स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना मा. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, "वक्तृत्व हे प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वपूर्ण अंग आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासातून विकसित केलेले स्वतःचे विचार समाजासमोर ठामपणे मांडण्यासाठी वक्तृत्व कलेचा आधार घ्यावा लागतो. या कलेच्या साधनेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी ल...

किसन वीर महाविद्यालयात थोर उद्दोजक रतन टाटा यांना श्रध्दांजली.

Image
  किसन वीर महाविद्यालयात थोर उद्दोजक रतन टाटा यांना श्रध्दांजली. ------------------------------------------ वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  ------------------------------------------ येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने भारत व जगभरातील थोर उद्योजक, महाराष्ट्राचे उद्योगरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण  रतन टाटा यांच्या तसेच महाविद्यालयात इ. अकरावी मध्ये शिकणारी कु. आर्या मुकेश पोळ यांच्या दुःखद निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन केले व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांच्या हस्ते स्व. रतन टाटा यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर शोकसभेत डॉ. गुरूनाथ फगरे यांनी 'रतन टाटा यांचे उद्योग, सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील कार्य' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट, डॉ. हणमंत कणसे, प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, श्री. भिमराव पटकुरे, डॉ. शिवाजी कांबळे, श्री. बाळासाहेब कोकरे, श्री. अर्जुन जाधव, श्री. बाळासाहेब टेमकर यांची विशेष उपस्थिती होती....

वसगडे ते नागाव, निमणी दरम्यान 13 ते 27 ऑक्टोबर कालावधीत वाहतूक नियमन.

Image
वसगडे ते नागाव, निमणी दरम्यान 13 ते 27 ऑक्टोबर कालावधीत वाहतूक नियमन. ------------------------------- मिरज तालुका. प्रतिनिधी  राजू कदम  ------------------------------- सांगली,  (जि. मा. का.) : मध्य रेल्वेच्या पुणे विभागावरील भिलवडी - नांद्रे स्थानकादरम्यान किर्लोस्करवाडी रेल्वे फाटक क्र. 119 कि.मी. 256/6-7 येथील वसगडे गाव ते नागाव, निमणी गाव दरम्यानचा राज्य महामार्ग क्र. 142 हा दि. 13 ते 27 ऑक्टोबर 2024 या कालावधीत बंद करून, सदर गेट वरून होणारी वाहतूक अन्य मार्गे वळविण्याबाबत तसेच वाहतूक सुरक्षा उपाययोजनेव्दारे वाहतू‌क नियंत्रीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निर्गमित केले आहेत. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. यांच्या मागणीच्या अनुषंगाने वसगडे ते निमणी येथील रेल्वे गेट भिलवडी – नांद्रे स्टेशन दरम्यान आर.ओ. बी. चे काम चालू असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 115 व 116 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून हे आदेश निर्गमित केले आहेत. सांगली शह...

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ द्या- सरपंच पद्मजा करपे.

Image
  मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ द्या- सरपंच पद्मजा करपे. ------------------------------------- कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ------------------------------------- मा. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ मिळणेसाठी  लोकनियुक्त सरपंच पद्मजा  करपे यांच्या कडून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस शिफारस पत्र देण्यात आले आहे . यावेळी उपमुख्य कार्यालय बापट कॅम्प श्री. विलास रामचंद्र शिर्के यांना शिफारस पत्र देणेत आले. तसेच सहाय्यक अभियंता श्री कुसळे साहेब महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी शाखा कार्यालय शिरोली पु. यांना शिफारस पण देणेत आले यावेळी पुढील शेतकरी 1) श्री. राजाराम दडगे  2).शंकर खटाळे .3)बाबासो परमाज 4)अण्णासो सावंत. या शेतकरी यांना वीज बिल मोफत मिळावे यावेळी  मा. उपसरपंच कृष्णात करपे अण्णा  किसान मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील संजय पाटील आणा  सावंत  तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

भारतीय संविधान कोणीच बदलू शकत नाही....! संविधानामुळेच भारत देश एकसंघ ; आमदार शामसुंदर शिंदे

Image
  भारतीय संविधान कोणीच बदलू शकत नाही....! संविधानामुळेच भारत देश एकसंघ ; आमदार शामसुंदर शिंदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण आमदार श्यामसुंदर शिंदे व सौ. आशाताई शिंदे यांच्या हस्ते संपन्न. लोहा शहरात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या क्रांतीसुर्य बौद्ध विहार येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते थाटात करण्यात आले यावेळी भंते पैयाबोधी, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी .एम. वाघमारे, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार सुरेशदादा गायकवाड, जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल मोरे ,काँग्रेस कमिटी नांदेड जिल्हाध्यक्ष बी .आर. कदम, नगरसेवक बबन निर्मले, नगरसेवक बालाजी खिलारे, काँग्रेस तालुका अध्यक्ष शरद पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम धोंडगे, पुतळा समितीच्या अध्यक्षा तथा  स्वागतेच्छुक श्रीमती पुष्पलता शंकरराव कापुरे, रवी कापुरे, अश्विनी कापुरे, भारतीय बौद्ध महासभेचे लोह...

पंचवीस वर्ष उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या करवीर प्रशाला शाळेचे मुख्याध्यापक आनंदा गुरव यांना मिळाला आदर्श शिक्षक पुरस्कार...

Image
 पंचवीस वर्ष उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या करवीर प्रशाला शाळेचे मुख्याध्यापक आनंदा गुरव यांना मिळाला आदर्श शिक्षक पुरस्कार... कोल्हापूर माझा मराठी न्युज या चॅनल तर्फे, समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तसचं सामाजिक भान असलेल्या नागरिकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.यामध्ये सन 1997 पासून आपली शैक्षणिक सेवा करणाऱ्या करवीर प्रशाला शाळेचे मुख्याध्यापक आनंदा गुरव यांना राज्यस्तरीय राजश्री शाहू छत्रपती  आदर्श शिक्षक  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार माजी आमदार उमाताई खापरे यांच्या हस्ते देण्यात आला. शैक्षणिक कामाबरोबरच सामाजिक भान जपत गुरव सर समाजात विविध कार्य करत, आपली शिक्षण शैक्षणिक सेवा बजावत आहे. यामुळे या शिक्षकाची संपूर्ण स्तरातील शुभेच्छा व्यक्त होत आहे

संजय नगरमध्ये 9 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, अत्याचाराची बातमी कळताच संतप्त जमावाकडून आरोपीच्या घराची तोडफोड.

Image
संजय नगरमध्ये 9 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, अत्याचाराची बातमी कळताच संतप्त जमावाकडून आरोपीच्या घराची तोडफोड. ------------------------------------ मिरज तालुका प्रतिनिधी  राजू कदम ------------------------------------   काही महिन्यापूर्वीच अल्पवयीन मुलीवर घडलेल्या घटनेनंतर आज परत संजयनगर येथे नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या घराची संतप्त नागरिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. तसेच अत्याचार झालेल्या सार्वजनिक शौचालयाची देखील संतप्त झालेल्या जमावाने तोडफोड केली आहे. 28 वर्षीय तरुणाने 9 वर्षाच्या मुलीवर ब्ल्यू फिल्म दाखवून लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर संजयनगर भागातील नागरिक संतप्त झाले होते. आरोपी तरुणास संजयनगर पोलिसांनी अटक करत आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे .

विशाल पाटील, ट्रेलर चांगला झाला पण ?

Image
  विशाल पाटील, ट्रेलर चांगला झाला पण ? ------------------------------------  मिरज तालुका  प्रतिनिधी  राजू कदम ------------------------------------    सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडूण आलेले खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत भाषेवरच्या प्रभुत्वाने चांगली छाप पाडली आहे. गेल्या पंचवीस-तीस वर्षात सांगलीच्या खासदाराचा आवाज संसदेत कधीच घुमला नव्हता. सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी महाराष्ट्राचे राजकारण सांगलीतून केले. राज्यभर-देशभर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली. राज्यात आपला दबदबा निर्माण केला पण संसदेत मात्र सांगलीचा आवाज क्षिण होता. सांगलीचे खासदार जिल्ह्यात शड्डू ठोकायचे, पोपटासारखे बोलायचे पण संसदेत मात्र त्यांच्या तोंडाला कुलपं लागलेली असायची. यापुर्वीचे सांगलीचे खासदार मुखदुर्बल घटकात मोडणारे होते. यात विशाल पाटलांचे वडील प्रकाशबापू पाटील, भाऊ प्रतिक पाटील आणि त्यांनी ज्यांचा पराभव केला ते भाजपाचे संजय पाटील यांची नावे आहेत. या खासदारांनी संसदेत कधीच आपली छाप पाडली नाही. त्यांना संसदेत कधीच धडपणे बोलता आले नाही. विशाल पाटलांनी पहिल्याच धडाक्यात हा अनुशेष भरून का...

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका परिसरातील गोवंशिय जनावरांची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या 04 इसमांच्या टोळीला सातारा पोलिसांनी केले तडीपार.

Image
  सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका परिसरातील गोवंशिय जनावरांची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या 04 इसमांच्या टोळीला सातारा पोलिसांनी केले तडीपार. ---------------------------------------- सातारा जिल्हा प्रतिनिधी अमर इंदलकर  ---------------------------------------- सातारा जिल्ह्यातील फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख (1) तौफिक इम्तियाज कुरेशी (2)इलाही हुसेन कुरेशी (3)अरबाज इम्तियाज कुरेशी (4) इनायत हुशेन कुरेशी सर्व राहणार - कुरेशीनगर मंगळवार पेठ फलटण तालुका, जिल्हा सातारा. यांना संपूर्ण सातारा जिल्ह्यातून 2 वर्षे तडीपार करण्यात आले असून त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा)अधिनियम 1995 व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 हे कायदे लागू असताना तसेंच गोवंशिय जनवारांची कत्तल-वाहतूक करताना मिळून आल्याने व त्यांच्यावर सातत्याने गुन्हे दाखल असल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. सुनिल महाडीक, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन दोन वर्षे तडीपार करणेबाबत...

डॉक्टर सुभाष पाटील हॉस्पिटल समोर विश्रामबाग चौकात नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा त्रास-आरोग्य विभागाचे झोपेचे सोंग-डॉग व्हॅन गायब लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे

Image
  डॉक्टर सुभाष पाटील हॉस्पिटल समोर विश्रामबाग चौकात नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा त्रास-आरोग्य विभागाचे झोपेचे सोंग-डॉग व्हॅन गायब लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे  ------------------------------------- मिरज तालुका प्रतिनिधी  राजू कदम ------------------------------------- विश्रामबाग चौकातील डॉक्टर सुभाष पाटील दवाखान्यासमोर आणि विश्रामबाग चौकात मोकाट कुत्र्यांचे अनेक कळप फिरत असून यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना  नाहक त्रास सहन करावा लागत आहे.     सदरची कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जात आहेत. याआधी या मोकाट कुत्र्यांकडून लहान बालकांसह जेष्ठ नागरिकांवर हल्ले झाल्याचे प्रकार घडले आहेत. या कुत्र्यांमुळे अनेक अपघात होऊन नागरिक गंभीर जखमी झाल्याचेही प्रकार घडले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे का? असा सवाल लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केला आहे .      आत्तापर्यंत आरोग्य विभाग काय करीत आहे? मोकाट कुत्र्यांचा अजून बंदोबस्त का झाला नाही?महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी या प्रकाराकडे तसेच आरोग्य विभागाकडेही  ग...

हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी !

Image
  हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी ! -------------------------------  मिरज तालुका प्रतिनिधी राजू कदम -------------------------------- हरयाणातील निवडणूक निकालाने काही दिवसांतच निवडणुकीला सामोरे जात असलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखीही वाढवली आहे.     हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्व एक्झिट पोल्स आणि राजकीय विश्लेषकांचे अंदाज मोडीत काढत बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. मागील १० वर्षांपासून सत्तेत असल्यामुळे निर्माण झालेला असंतोष, शेतकऱ्यांची नाराजी, महिला पैलवानांचे आंदोलन या पार्श्वभूमीवर भाजपला हरयाणाची निवडणूक जिंकणं कठीण जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज प्रत्यक्ष निकालात भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत ९० जागांच्या हरयाणा विधानसभेत आताच्या स्थितीत ४९ जागांवर आघाडी घेतली आहे. हरयाणातील या निकालामुळे तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांची निराशा झालीच आहे, मात्र त्यासोबतच काही दिवसांतच निवडणुकीला सामोरे जात असलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखीही व...