Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री शिवाजी सहकारी पतसंस्था व स्नेहकिरण धान्य गोडाऊन चिखली च्या वतीने शेतकऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा संपन्न.

 श्री शिवाजी सहकारी पतसंस्था व स्नेहकिरण धान्य गोडाऊन चिखली च्या वतीने शेतकऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा संपन्न.

------------------------------- 

 रिसोड प्रतिनिधी

. रणजीत सिंह ठाकुर 

------------------------------- 

दिनांक 13 सप्टेंबर रोजी श्री शिवाजी सहकारी पतसंस्था व स्नेहकिरण गोडाऊन अंतर्गत मालतारण कर्जदार शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री किरण रावजी सरनाईक आमदार अमरावती विभाग हे होते. या कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री घमरावजी घुगे मुख्य लेखापरीक्षक हे होते

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी सहकारी पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक श्री राऊत यांनी केले. त्यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सवलती याबद्दल विविध योजनांची माहिती दिली.मुख्य लेखा परीक्षक श्री घमराव घुगे साहेब यांनी शेतकऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले धान्य गोडाऊन च्या माध्यमातून धान्याची पत कायम राहते . नुकसान होत नाही .तसेच अत्यावश्यक वेळेस माफक दरात कर्जही उपलब्ध होते. याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. त्यामुळे याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. मा श्री किरण रावजी सरनाईक आमदार अमरावती विभाग यांनी या पतसंस्थेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सवलती बद्दल सखोलपणे माहिती दिली.ज्या शेतकऱ्यांनी माल ठेवलेला आहे त्यांनी सप्टेंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत माल नेल्यास त्यांना भाडे सवलत तथा घेतलेल्या कर्जावरील पूर्ण व्याज माफ करणे अशा अनेक सवलती बद्दल माहिती त्यांनी दिली.  सर्वांनी या गोडाऊनचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी श्री  मंगेश सरनाईक व अन्य काही शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी कोल्ड स्टोरेज ची मागणी केली तसेच आणखी एक गोडाऊन या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली यावर श्री किरण रावजी सरनाईक यांनी आणखी एक गोडाऊन बांधून दिले जाईल याबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाला माजी सरपंच श्री शंकरराव गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश सरनाईक श्री स्वप्निलजी सरनाईक अकोला जिल्हा मध्यवर्ती चे शाखा व्यवस्थापक सुबोध घुगे साहेब प्रभाकर जी पाटील तथा शेकडो शेतकरी उपस्थित होते यावेळी श्री अशोक वाकळे यांचा हे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्री हर्षुभाऊ केळकर श्री सुधाकर जी इंगळे प्रवीण शेख खडसे सरकटे सर शेतकरी बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रकांत शिंदे सर यांनी केले तर आभार श्री अनिल मडके सर यांनी मांडले

Post a Comment

0 Comments