विद्यार्थ्यांनी सेवाभाव ठेवून कार्यरत रहावे डॉ. शशिकांत साळुंखे.

 विद्यार्थ्यांनी सेवाभाव ठेवून कार्यरत रहावे डॉ. शशिकांत साळुंखे.

--------------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

--------------------------------------- 

‘किसन वीर’ मध्ये युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर कार्यशाळा संपन्न 

वाई : दि. २१ सप्टेंबर

  एन.एस. एस.च्या स्वयंसेवकानी स्वतःबरोबरच समाजाचाही विचार करावा. आपला देश तरुणांचा देश आहे. आजचे युवक मात्र फक्त नोकरी, छोकरी आणि भाकरी यांच्या पाठीमागे लागले आहेत. तारुण्य फक्त बोलण्यासाठी, वाचण्यासाठी नसून, कर्तृत्व दाखवण्यासाठी आहे. एन.एस.एस.च्या स्वयंसेवकानी सेवाभाव जागृत ठेवून कार्यरत रहावे. असे प्रतिपादन अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ. शशिकांत साळुंखे यांनी केले.

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ व कनिष्ठ विभागाच्या वतीने आयोजित युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. कार्यक्रमास उद्योजक सागर जाधव, कला विभागाचे उपप्राचार्य व एन.एस. एस.चे सल्लागार प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, प्रा. (डॉ.) विनोद वीर, प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट, श्री. हरेश कारंडे, श्री. राजन करपे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  डॉ. शशिकांत साळुंखे म्हणाले, आपल्या इतिहासाच्या पाना-पानावर हजारो आयडाँल आहेत. सिनेतारकांना फॉलो करण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांना व त्यांच्या विचारांना स्वतःच्या जीवनात उतरावा. तुमचे हे वय शिकण्याचे व घडण्याचे आहे. सदविचार हा मित्र बनवा. तुम्ही देशाचे आधारस्तंभ आहात. कॉलेजजीवन सुवर्णअक्षरांनी लिहावे असे असते. या वयात व्यायाम व अभ्यास करा. मोबाईल बाजूला ठेऊन निसर्गचक्र व जैविक घड्याळ समजून घ्या, सेवा हाच ईश्वर मानून कार्यरत रहा असा संदेश त्यांनी दिला.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्व जागृत करून, स्वतःचे नेतृत्व स्वतः करावे. ध्येय साध्य करण्यासाठी दृढनिश्चय करावा. लवकर झोपणे व लवकर उठणे हा मंत्र पूर्वजांनी आपल्याला दिला आहे, तो अमलात आणा. आपणही इच्छाशक्ती व निश्चयाच्या जोरावर आपला उद्धार करू शकतो, त्यासाठी दिनचर्या व आहारावर लक्ष केंद्रीत करा.

प्रकल्प अधिकारी  डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रीमती सुमती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अंबादास सकट यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संदीप वाटेगांवकर, कनिष्ठ लिपिक जितेंद्र चव्हाण, हर्षल वाडकर, नेहा पिसाळ, प्रणव शिंदे, सिद्धी गायकवाड, समिक्षा शेलार, साक्षी यादव, स्विटी नरवडे, आयुष लोखंडे, शुभम जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात वरिष्ठ व कनिष्ठ विभागाच्या एन.एस. एस.च्या  स्वयंसेवकानी सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.