आडवाटेवरचा अपरिचित किल्ला म्हणजे किल्ले सोनगड.
आडवाटेवरचा अपरिचित किल्ला म्हणजे किल्ले सोनगड.
----------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
----------------------------------
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुकाच्या पश्चिमेला असणारा सह्याद्रीच्या पूर्व रांगेत कोल्हापूर,सांगली,सातारा पुणे,जिल्ह्यांच्या सीमा येतात यांच पूर्वरांगेतून तळकोकणात उतरणार्या घाटवाटा व घाटामधून होणाऱ्या माल-वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी सातवाहन-दुसऱ्या काळापासून अकराव्या - बाराव्या यापुढे सतराव्या शतकाच्या कालखंडामध्ये घाटमाथ्यावर व घाटाखाली किल्ल्यांची साखळी निर्माण होत गेली त्यामध्ये अनेक लहान मोठे किल्ले असून त्यापैकीच रांगणा किल्लाची लहान भूमिका बजावणारे घाटमाथ्याला समांतर असणारे किल्ले आजही अपरिचित आहेत भटवाडी,आडे - घोटगे, शिवडाव-सोनवडे - नरडवे,अशा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले सोनगड भैरवगड पावनगड यांचे सब-स्टेशन म्हणून किल्ले भुदरगडचा उल्लेख येतो त्यापैकी शिवडाव- सोनवडे,घोटगे भैरीचा घाट तांब्याचीवाडी,आडे - घोटगेची हेळ्याची झाडे असणारी हेळ्याची पाझ शिवडाव,नाईकवाडी- नरडवे गोलाणचे 'बरमानाचे मंदिर' असणारी बरमनाची पाझ इत्यादी घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला सोनगड इतिहासामध्ये नरसिंहगड म्हणून नोंद असणारा किल्ला एकविसाव्या शतकात विकासापासून बारा कोस दूर आहे मागील तीन वर्षीपूर्वी रांगणा गडाप्रमाणे यावर पण तोफा मिळाल्या आहेत,मात्र आता पश्चिम व पूर्वेला गडनदीच्या खोऱ्यात मिळालेल्या तोफेमुळे अपरिचित असणारा सोनगड सध्या पर्यटन म्हणून पुढे येत आहे अशा आडवाटेवरच्या अपरिचित किल्ल्यावर दोन ते तीन मार्गांनी पोहोचता येते भौगोलिकदृष्ट्या जरी किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात असला तरी आपल्या सह्याद्रीच्या एका रांगेने घाटमाथ्याला समांतर आहे कोल्हापूरहून ९५ किलोमीटर असणारा कोल्हापूर गारगोटी-शिवडाव - नाईकवाडी गाडी शिवडाव - नाईकवाडी पर्यंत पोचून पुढे एक तास पायवाटेने सह्याद्रीच्या जंगलातून चालत आपण थेट गडाच्या पूर्वेकडील उंच बुर्जाखाली पोहोचतो व तिथून एक मोठी चढाई करून किल्ल्याच्या आत प्रवेश करतो कोल्हापूर ते शिवडाव- नाईकवाडी हे अंतर सुमारे ९५ कि.मी असून आपल्याकडे जर भक्कम वाहन असल्यास किल्ल्याजवळच्या शेवटच्या घाटमाथ्यावर जाता येते व तेथून पन्नास मिनिटात आपण किल्ल्यावर पोहोचतो तळकोकणातून किल्ल्यावर याचे असल्यास कुडाळ किंवा कणकवली तालुकातील सोनवडे या गावच्या लहान असणाऱ्या पवारवाडी,दुर्गेवाडीवाडी येथून गडावर येता येते मात्र येथून आपल्याला दोन ते तीन तास खडी चढ चढावी लागते किल्लाचा बारा एकरामध्ये विस्तार आहे उन्हाळ्यामध्ये पाण्याची कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने गड- इतिहास-ट्रिक प्रेमींनी पायथ्याच्या गावातून पाण्याच्या बाटल्या भरून सोबत घ्यावात,इतिहासात डोकावून पाहताना ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास केल्यास हा किल्ला तळकोकणातील राज्यकर्त्यांनी रांगणा किल्ल्याला समांतर घाटवाटावर लक्ष ठेवण्यासाठी सतराव्या शतकामध्ये यांची निर्मिती केली तळकोकणातून गिरिदुर्ग असणारा कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातून नजीक कोल्हापूर भुदरगड व सिंधुदुर्ग कुडाळच्या जिल्हा हद्दीवर आहे समुद्रसपाटीपासून उंची जवळ जवळ ८०० मीटर आहे इतिहासकाळात वेंगुर्ला,मालवण बंदरातून येणारा माल घोटगे सोनवडे - शिवडाव घाटातून घाटमाथ्यावरील पाटगाव कडगाव किंवा आजरा मार्गे कोल्हापुरास जात यावर लक्ष ठेवण्यासाठी यांची निर्मिती केली असावी घाटमार्गाच्या मुखाशी घाटमाथ्यावर रांगणा इतिहास प्रसिद्ध मोठा किल्ला आहे सोनगड उर्फ नरसिंहगडाचे रांगणा किल्ल्याशी असणारे निकटचे संबंध पाहता रांगणा किल्ल्याला समांतर महत्त्वाचा दुवा आहे यांचे बांधण्याचे श्रेय तळकोकणातील खेमसावंत यांना जाते त्यांनी १७०९ ते १७३८ दरम्यान सोनगडची दुरुस्ती केली व इ.स १७८८ मध्ये करवीर सत्तेने हल्ला व मोर्चे बांधून गड तांब्यात घेतला पण इ.स १७९३मध्ये झालेल्या समेटानंतर गड पुन्हा खेमसावंत यांच्याकडे आला त्यानंतर इ.स १८०५ मध्ये खेमसावंत यांच्या गृहकलात गड पुन्हा करवीरकर यांच्या कडे आला असा उल्लेख आढळतो पुढे १८१८ मध्ये इंग्रजांनी महाराष्ट्रातील जवळपास संगळ्या किल्ल्याचा ताबा घेतला तेव्हा हा किल्ला करवीरकरांकडे ठेवला जो शेवटपर्यंत त्यांच्याकडेच राहिला,गडावरती गडाचाअधिपती श्री भैरवनाथ, सोनदेव यांची छोटेखानी मंदिर समाधी दोन लहान तलाव जुन्या कचेरीचे अवशेष दोन वर्षांपूर्वी मिळालेल्या लहान व मोठी तोफ पाहण्यास मिळतात,तळकोकणामधून पायवाटेने येताना महादरवाजाची झालेली पडझड दिसते,गडाच्या बालेकिल्ल्यावरून तळकोकणातील दिसणारे अरबीसमुद्राचे अनोखे नयन:दृश्य वेंगुर्ला व मालवण बंदराचे एका नजरेच्या टप्प्यात होणारे दर्शन आणि जशी महादेवगडाची तटबंदी अलग करून आंबोलीघाट रस्त्याची निर्मिती केली गेली,त्याचप्रमाणे भुदरगड तालुक्यातून होत असलेला शिवडाव - सोनवडे घाटरस्ता किल्ले सोनगडच्या पूर्व बुर्जाच्या डाव्या बाजूने जात असल्यामुळे भविष्यात किल्ले सोनगड पर्यटन दुष्ट्या शासन व पुरातत्व खात्याने यावर प्राथमिक सुविधा करून गडाला पूर्ववैभव करून द्यावे अशी इतिहास प्रेमीं मागणी आहेची केली
पर्यटन प्रेमी
नानाश्री पाटील
पोलीस पाटील,नांदोलीकर
Comments
Post a Comment