Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गांधीनगर येथे गर्दीच्या ठिकाणी धोकादायक सिलेंडर घेऊन फुगे फुगवणाऱ्या विक्रेत्याला शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विचारला जाब.

गांधीनगर येथे गर्दीच्या ठिकाणी धोकादायक सिलेंडर घेऊन फुगे फुगवणाऱ्या विक्रेत्याला शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विचारला जाब.

गणेशोत्सव काळामध्ये गांधीनगरमध्ये देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी कार्बाइट सदृश्य रासायनिक गॅस भरून फुगे फुगवले जातात. कोणत्याही हॉलमार्क शिवाय असणारी सिलेंडर घेउन गर्दीच्या ठिकाणी फुगे विक्रेते फुगे फुगवून देत असतात. मुळात उपजीविकेचे साधन म्हणून आमचा कोणाला विरोध असण्याचा प्रश्नच नाही. परंतु अशा पध्दतीचे तकलादू सिलेंडर घेऊन गर्दीच्या ठिकाणी असे फुगे विकणे म्हणजे जिवंत बॉम्ब घेऊन फिरल्याच्या प्रकार आहे. अनेक लहान मुले हे फुगे विकत घेण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी करतात. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडून या लहान मुलांच्या जीवितास हानी झाली तर त्याला कोण जबाबदार? मुळात असे विक्रेते कोणत्या कंपनीचा सिलेंडर वापरतात किंवा त्याची तांत्रिक प्रक्रिया काय असते आणि ते किती सुरक्षित आहे याचा विचार प्रशासनाने करून अशा विक्रेत्यांना फुगे विकण्यास निर्बंध घालावे. एखादी दुर्घटना घडल्यास खूप मोठी जिवीतहानी होऊ शकते. अशा प्रकारची दुर्घटना पूर्वी घडलेली असताना सुद्धा पोलीस प्रशासन याकडे कसे काय दुर्लक्ष करू शकते याचेच आश्चर्य वाटते.

   शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गर्दीच्या ठिकाणी फुगे विकणाऱ्या या विक्रेत्यांना याच्या सुरक्षेविषयी काही प्रश्न विचारले असता त्यांना कोणतीही उत्तरे देता आली नाहीत.त्यांना गर्दीच्या ठिकाणाहून दूर जाण्याची ताकीद शिवसैनिकांनी दिली.अशा विक्रेत्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राजू यादव यांनी केली.

   यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव,  शरद माळी,  योगेश लोहार, दिलीप सावंत, दिपक पोपटाणी, दिपक धिंग, दिपक अंकल, सुनील पारपाणी,किशोर कामरा,जितू चावला,भगवान पंजवाणी,राजेश सचदेव,श्रीकांत सावंत,वसंत पोवार, नमेश चव्हाण,अजित पाटील,अजित चव्हाण आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.*

Post a Comment

0 Comments