Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दि.०६ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात भव्य संविधान परिषदेसह डिजिटल लायब्ररीचा लोकार्पण सोहळा : राजेश क्षीरसागर यांची माहिती

दि.०६ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात भव्य संविधान परिषदेसह  डिजिटल लायब्ररीचा लोकार्पण सोहळा : राजेश क्षीरसागर यांची माहिती

विचारेमाळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररीच्या कामाची पाहणी.

कोल्हापूर दि.१६ : संविधानाची मुल्ये ही सुजान नागरिक घडवणारी आहेत. संविधानामुळेच भारतीय लोकशाहीची पाळेमुळे अधिकपणे घट्ट रोवली गेली आहेत. सर्वांना समान न्याय देणाऱ्या  संविधानाची माहिती आजच्या पिढीला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी मार्गक्रमण करण्याची आवश्यकता युवा पिढीला आहे. आपल्या देशावर प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. पण राष्ट्रभक्तीची व्याख्या हि संविधानाशिवाय असूच शकत नाही कारण आपल्या देशातील संविधानाला प्रमाण मानून केलेली प्रत्येक कृती राष्ट्रभक्ती आहे. म्हणून संविधानातील न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्ये इथल्या प्रत्येक नागरिकांमध्ये रुजावीत आणि संविधानाबद्दल पसरविण्यात येणारे गैरसमज दूर व्हावेत या मूळ उद्देशाने दि.०६ ऑक्टोबर २०२४ रोजी कोल्हापुरात "संविधान परिषद" पार पडणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. 


राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२१-२२ अंतर्गत विचारे माळ येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी व ग्रंथालयासाठी रु.५० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. डिजिटल लायब्ररी व ग्रंथालयाच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत करत आवश्यक सूचना दिल्या. या डिजिटल लायब्ररी व ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा देखील दि.०६ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडणार आहे.


यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. भारत सरकारने संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना अभिवादन म्हणून २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. आता संपूर्ण देशात संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. आपल्या प्रजासात्ताक दिनालाही २६  जानेवारी २०२५ रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. हा एक भारतीय लोकशाहीला दुग्धशर्करा आणि सुवर्ण योग आहे. यानिमित्ताने राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर भूमी कोल्हापुरात दि.०६ ऑक्टोबर २०२४ रोजी विचारे माळ येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी व ग्रंथालय येथे संविधान आणि लोकशाहीचा महाउत्सव "संविधान परिषद" करण्यात आली आहे. याकरिता सुमारे २५ हजार आंबेडकर अनुयायी आणि बहुजन समाजाचे नागरिक उपस्थित राहणार असल्याचे माहिती दिली.

 

यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, हर्षजीत घाटगे, उपशहरअभियंता रमेश कांबळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण, डॉ.प्रवीण कोडोलीकर, माजी नगरसेवक मारुती माने, माजी नगरसेवक तुकाराम तेरदाळकर, रावसाहेब वसगडेकर, अजिंक्य शिंदे, विराज सुतार आदी उपस्थित होते.


प्रति,

मा.संपादकसो,

दैनिक/वृत्तवाहिनी/वेब पोर्टल,

वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक/वृत्तवाहिनी/वेब पोर्टल वर प्रसिद्ध करून सहकार्य करावे, ही विनंती.

कळावे,

आपला,

नंदू सुतार, कार्यालय प्रमुख, शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, कोल्हापूर.

Post a Comment

0 Comments