कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित आरोग्य व रक्तदान शिबिरास रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद.

 कुपवाड एमआयडीसी पोलीस  ठाण्याच्या वतीने आयोजित आरोग्य व रक्तदान शिबिरास रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद. 

------------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम 

------------------------------------

कुपवाड: पोलीस एमआयडीसी पोलीस अधिकारी व अंमलदार व गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेशोत्सव 2024 निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरात कुपवाड परिसरातील उद्योजक व कामगार वर्ग गणेश मंडळ या रक्तदात्यांकडून उतस्फुर्त प्रतिसाद मिळाला. 

सदर शिबिराचे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीमती रितू खोखर व कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या हस्ते उद्घाटन करून उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे . या शिबिरास प्रणील गिल्डा पोलीस उपाधीक्षक मिरज कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर,सहा. पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे व पोलीस अंमलदार यांच्यासह 139 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

300 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरासाठी वसंतदादा पाटील रक्त केंद्र व रक्त विकार संशोधन केंद्र मिरज ब्लड बँक व स्वामी विवेकानंद हॉस्पिटल बामणोली यांच्या डॉ. अमीस माने व त्यांच्या पथक यांनी सहभाग नोंदवला आहे.

यावेळी रितू खोखर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा , सहा पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, सहा. पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे व कुपवाड पोलीस ठाण्याचे हवालदार आणि अंमलदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला..

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.