उत्तमचंद बगडिया महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन संपन्न स्थानिक.
उत्तमचंद बगडिया महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन संपन्न स्थानिक.
---------------------------------
रिसोड प्रतिनिधी.
रणजीत सिंह ठाकुर
----------------------------------
उत्तमचंद बगडिया कनिष्ठ महाविद्यालय मध्ये शिक्षक दिन संपन्न करण्यात आला. शिक्षक दिन हा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यामध्ये वर्ग अकरावी व बारावीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी स्वयं अध्यापनाचे कार्य केले. त्यामध्ये कु.मोहिनी बनकर कु. आचल बानोरे, सुरज नरवाडे, विनायक गायकवाड, तेजस कांबळे व तसेच बारावी मधील महेश डाखोरे, ओम राऊत, रामप्रसाद ढोले , आदर्श इंगळे, कार्तिक खरात कु. साक्षी बुधवंत, कु. श्रद्धा लांडगे, कु.नंदनी कऱ्हे गौतम खिलारे यांनी स्वयम अध्यापन केले. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .विनोद कुलकर्णी सर हे उपस्थित होते व या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ विभाग प्रमुख संदीप जुनघरे सर हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धोंगडे यांनी केले. प्राचार्य यांनी आपल्या भाषणामध्ये एक आदर्श शिक्षक कसा असावा याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर प्रा संदीप जुनघरे सर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यानंतर अमरदीप साबळे सर यांनी शिक्षकाचे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये असलेले महत्त्व व सद्यस्थितीत असलेल्या शिक्षकाचे वर्णन त्यांनी थोडक्यात शब्दात व्यक्त केले. या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महेश डाखोरे यांनी केले. हा कार्यक्रम प्रा विनोद राऊत, प्रा. राम जुनघरे कु.पूजा पाठक मॅडम प्रा.आदिनाथ पायघन प्रा. ज्ञानेश्वर खडसे सर व तसेच श्री घुगे ,श्री कोल्हे, श्री पुरी, श्री च-हाटे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बहुमलाचे सहकार्य केले. व या कार्यक्रमासाठी असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.
Comments
Post a Comment