आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपला विजय निश्चित आमदार राजू बाबा आवळे.

 आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपला विजय निश्चित आमदार राजू बाबा आवळे.

------------------------------ 

कुंभोज प्रतिनिधी

विनोद शिंगे

------------------------------ 

हातकणंगले विधानसभा मतदारसंघात काम करत असताना गटातटाचे राजकारण न करता केवळ विकासाचे राजकारण केले असून आत्तापर्यंत मतदारसंघात कोट्यावधीची विकासकामे आणून सर्वसामान्य गावांना व जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे कायम काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केली आहे .व इथून पुढे करत राहील असे वक्तव्य हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू बाबा आवळे यांनी काढले. ते कुंभोज, हिंगणगाव ,दुर्गेवाडी संवाद यात्रेदरम्यान बोलत होते.

        यावेळी कुंभोज येथे महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांच्या हस्ते आमदार राजू बाबा आवळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हिंगणगाव येथे. वीरधबल सेवा सोसायटीचे माजी चेअरमन विश्वास कोळी व माजी सरपंच महावीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हिंगणगाव परिसरातील अनेक समस्या असून त्या पूर्ण करण्यासाठी आमदार राजू बाबा आवळे यांनी सहकार्य करावे अशी मागणी महिला प्रतिनिधी. नंदाताई कोळी यांनी आमदार राजू बाबा आवळे यांच्याकडे केली सदर कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांची अनुपस्थिती सर्व उपस्थित त्यांना जाणवत होती. 

    पण आम्ही यावेळी विद्यमान आमदार राजू बाबा आवळे यांच्या हस्ते वीरधवल सेवा सोसायटीची चेअरमन बाहुबली पाटील व सरस्वती कुंडले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे  गटनेते तसेच सदाशिव महापुरे,दाविद घाटगे,सचीन पुजारी,त्रुतुराज तोरसकर,संभाजी पाटील ,महावीर देसाई, सुनील  देसाई भागोजी मेटकरी, रफिक मुजावर,सुनील देशमुख अण्णा नाडे ,लखन कोळी शिवाजी बंडगर ,रत्नदीप कोळी. बापूसाहेब नळे, सुकुमार देसाई उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.