राधानगरी वन परिक्षेत्रामध्ये साळींदर ची शिकार..संशयित आरोपीस तीन दिवसाची वन कोठडी
राधानगरी वन परिक्षेत्रामध्ये साळींदर ची शिकार..संशयित आरोपीस तीन दिवसाची वन कोठडी.
-------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------------
गारगोटी वनपरिक्षेत्रामध्ये घोरपड शिकार केली.असल्याची माहिती मिळाल्यामुळे संशयित आरोपी
सनी विश्वास राऊळ. वय २४ रा. निष्णप, ता. भुदरगड यांच्याकडे माहिती घेतली असता. सनी राऊळ याच्या मोबाईल मध्ये साळींदर या वन्य प्राण्याचे शिकार केलेला फोटो आढळून आला.
त्याबाबत आधिक चौकशी केली असता. त्याने दिनांक 13 सप्टेंबर रोजी मौजे सुंळबी, ता. राधानगरी, परिसरात साळींदरची शिकार केल्याचे कबूल केले. त्या अनुषंगाने, राधानगरी वनपरिक्षेत्रातील वनरक्षक सरवडे यांनी त्याचेकडील वन्यजीव (संरक्षण) अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला असून, सदरच्या आरोपीस ताब्यात घेऊन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राधानगरी यांचे समोर हजर केले असता. त्याला २७ सप्टेंबर२०२४ पर्यंत वनकोठडी सुनावली आहे. याबाबतचा अधिक तपास केला असता, आरोपीने दिलेल्या माहितीनुसार प्रदिप कृष्णा राऊळ वय ३३ वर्ष, रा. निष्णप, सचिन कृष्णा राऊळ वय ४० वर्ष, रा. निष्णप,गणेश उर्फ संतोष निवृत्ती बेलेकर वय ३२ वर्ष, रा. करडवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर यांचाही या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे.
यानुसार सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक एन. एस. कांबळे, वनक्षेत्रपाल राधानगरी व्ही. एन. पाटील, वनपाल एस.बी.भाट, वनरक्षक एम.डी. अंगज, वनरक्षक जे.एस. साबळे, वनरक्षक ओ.एस. संकपाळ करित आहेत.
Comments
Post a Comment