उचगाव येथील युवकांकडून दोन अग्नी शस्त्रासह जिवंत राऊंड जप्त.

 उचगाव येथील युवकांकडून दोन अग्नी शस्त्रासह जिवंत राऊंड जप्त.

----------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

शशिकांत कुंभार.

----------------------------------

 गणेशोत्सव कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, गणेशोत्सव शांततेच्या वातावरणात पार पाडावा याकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांना प्राणघातक शस्त्र बाळगनाऱ्या लोकांची गोपनीय माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक यांनी दिल्या होत्या.


दिलेल्या सुचनेनुसार.  पोलीस निरीक्षक, रवींद्र कळमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी आपल्या शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, वैभव पाटील, संतोष बरगे, परशुराम गुजरे, गजानन गुरव, प्रविण पाटील, प्रदिप पाटील, विशाल खराडे व महेंद्र कोरवी यांचे पथक नियुक्त करून त्यांना योग्य त्या सुचना दिल्या. त्यानुसार माहिती मिळवत असताना स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेच्या   वैभव पाटील यांना खात्रीशीर माहिती मिळाली उचगाव येथील रोहन पाटील याचेकडे 01 पिस्टल व 01 रिव्हॉल्वर असून तो आज रोजी माळीवाडा, उचगाव येथे कोणालातरी विक्री करण्यासाठी येणार आहे. असल्याणे स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी माळीवाडा उचगाव येथे सापळा लावला त्या वेळी रोहन रुपेश पाटील, वय 20 वर्षे, रा. विठलाई कॉलनी, मणेरमळा, उचगाव, ता. करवीर हा माळीवाडा येथे आला असता त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता  त्यांच्या ताब्यातील 01 पिस्टल, 01 रिवॉल्वर व 02 जिवंत राऊंड असा एकूण 1,01,000/- रूपये किंमतीच्या वस्तु मिळून आल्या त्या कायदेशिर प्रक्रीया करून हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदर इसमाविरुध्द गांधीनगर पोलीस ठाणेस आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदरच्या वस्तु कोणाकडून व कोणत्या उद्देशासाठी आणल्या आहेत याबाबतचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाणे करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.