चंदुर येथे महासिध्द देवालय परिसर भक्तनिवास बांधणे भूमीपूजन-आ.प्रकाश आवाडे.
चंदुर येथे महासिध्द देवालय परिसर भक्तनिवास बांधणे भूमीपूजन-आ.प्रकाश आवाडे.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या ३२ लाख निधीतून चंदूर येथील श्री महासिध्द देवालय परिसर भक्तनिवास बांधणे या भूमीपूजन सोहळ्याचे उद्घाटन आमदार प्रकाश आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
यावेळी माजी सभापती पंचायत समिती महेश पाटील, सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच स्वाती कदम, शालन पाटील, शुभांगी पाटील, धुळाप्पा पुजारी,वैशाली पाटील, ललिता पुजारी, संदिप कांबळे, फिरोज शेख, समस्त धनगर समाज व श्री महासिध्द देवस्थान कमिटी, गावातील सर्व तरुण मंडळे, सेवा संस्था, महिला बचत गट व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment