मडिलगे बुद्रुक येथील विवाहितेची हत्या की आत्महत्या परिसरात चर्चा.

 मडिलगे बुद्रुक येथील विवाहितेची हत्या की आत्महत्या परिसरात चर्चा.

---------------------------- 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

मडीलगे ( प्रतिनिधी ) मडीलगे बुद्रुक ता .भुदरगड येथे सासू सासऱ्याशी भांडण झाल्याच्या रागातून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. निवेदिता संदिप उगले वय 33 रा.मडिलगे बु ता. भुदरगड जि.कोल्हापुर असे या विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी मयत निवेदिता ही चे वडील विलास श्रीपती घराऴ रा.सिध्दनेर्ली ता.कागल यांनी भुदरगड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.


पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, की मडीलगे बुद्रुकयेथील निवेदिता उगले हिचा सासरा दिनकर महादेव उगले आणि सासू मंगल दिनकर उगले दोघेही रा.मडिलगे बु ता.भुदरगड यांच्याशी गुरुवार दि 29 ऑगस्ट 2024 रोजी साडे सहाच्या सुमारास वाद झाला होता. या रागातून तिने “कामत”नावाच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत तक्रारीत मुलीच्या आत्महत्येला सासू सासरे जबाबदार असल्याचे तिच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, घडल्या प्रकाराबाबत पंचक्रोशीत हळहळ ही व्यक्त केली जात आहे. मयत निवेदिता ही मनमिळावू स्वभावाची असल्याने ती सर्वांमध्ये मिळून मिसळून असायची मात्र अचानक घडल्या प्रकाराने मडीलगे बुद्रुकवर शोककळा पसरली असून या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


सासू सासरे तिच्या मृत्यूस जबाबदार; त्यांना अटक करा..!  


मयत निवेदित्ताच्या पश्चात पती, दोन मुले, आईवडील ,भाऊ असा परिवार आहे. तसेच निवेदिताच्या मृत्यूनंतर सासू सासरे हे तिच्या मृत्यूस जबाबदार असून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी सिद्धनेर्ली नागरिकांनी केली आहे. येत्या 4 दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास सिद्धनेर्ली ग्रामस्थांच्यावतीने भुदरगड पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्यात येईल. असा इशारा ही सिद्धनेर्ली नागरिकांनी दिला आहे. याबाबत भुदरगड पोलिसांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.