किसन वीर महाविद्यालयात स्वच्छता मोहीम राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम.

 किसन वीर महाविद्यालयात स्वच्छता मोहीम राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम.


--------------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

--------------------------------------- 

वाई, ता. २४ : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा अंतर्गत व राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या मार्गदर्शनाखाली फुलपाखरू उद्यानाची स्वच्छता व झाडांना आळे करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

याप्रसंगी डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, महात्मा गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. सत्य व अहिंसा या तत्त्वांबरोबरच स्वच्छतेचाही संदेश दिला आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने आठवड्यातील दोन तास राष्ट्रसेवेसाठी, स्वच्छतेसाठी दिल्यास महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ भारत होण्यास वेळ लागणार नाही. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिया पिसाळ, अर्चना चव्हाण, श्वेता शिंदे, सायली बांद्रे, श्रद्धा कदम, श्रद्धा ढोकळे, भाग्यश्री कारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात एन.एस. एस.च्या  स्वयंसेवकानी सहभाग घेतला.

स्वयंसेविका विजया जगताप हिने राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ दिली. कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात व डॉ. अंबादास सकट यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या उपक्रमात कला विभागाचे उपप्राचार्य व एन. एस. एस. चे सल्लागार प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे, भूगोल विभागप्रमुख प्रा.(डॉ.) विनोद वीर, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य श्री. भीमराव पटकुरे, डॉ. संदीप वाटेगावकर, श्रीमती नीलम भोसले, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.