विदर्भात आठ महिन्यात ७०० शेतकऱ्यांचे बळी. धक्कादायक बाब. दर आठ तासात एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला.

 विदर्भात आठ महिन्यात ७०० शेतकऱ्यांचे बळी. धक्कादायक बाब. दर आठ तासात एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला.

-----------------------------------

 फ्रंटलाईन  न्युज महाराष्ट्र.

अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

 पी एन .देशमुख.

-----------------------------------

अमरावती.

राज्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या पश्चिम विदर्भात होत आहे

विदर्भात यंदा आठ महिन्यात ६९८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला आहे. दर आठ तासात एक शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा बळी ठरत असल्याचे टाहक वास्तव आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, सावकाराचे कर्ज व बँकेचे कर्ज, आजारपणा, लग्न, अन्य कारणामुळे शेतकरी आत्महत्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामध्ये मराठवाड्यातील शेतकरी सावरला; पण पश्चिम विदर्भातील शेतकरी संघर्ष वर मात करीत आहे. यासाठी शासन प्रशासनाने प्रयत्न थिटे असल्याने दर दिवशी तीन शेतकरी आसमानी व सुलतानी संकटाचे बळी ठरत आहेत. शेतकरी आत्महत्या प्रमाण जिल्ह्यात सन२००१ पासून शेतकरी आत्महत्या ची नोंद ठेवली जात आहे. त्यानुसार अमरावती विभागात आतापर्यंत २० हजार ७७२ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. त्यापैकी १० हजार ७६३ प्रकरणे विविध कारणांनी अपात्र, तर ९ हजार ७३५ प्रकरणे पात्र ठरली आहेत.९ हजार५३७ प्रकरणात शासनाकडून मदत देण्यात आलेली आहे. अद्याप २७४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. शासन प्रशासन शेतकरी आत्महत्या विषयी गंभीर नसल्याने कोणत्याही ठोस उपाययोजना यामध्ये झाल्या नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यंदा आठ महिन्यात ६९८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्हा सर्वाधिक २०४, अमरावती जिल्ह्यात १८०, बुलढाणा जिल्ह्यात १५५, अकोला जिल्ह्यात १०६ व वाशिम जिल्ह्यात ५३ प्रकरण आहेत. यापैकी २१८ प्रकरणे पात्र, २१५ अपात्र, २६५ चौकशीसाठी प्रलंबित प्रकरणात शासनाकडून मदत देण्यात आली आहे. 

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.