जादा परताव्याचे आमिष दाखवून केली सहा लाखांची फसवणूक.
जादा परताव्याचे आमिष दाखवून केली सहा लाखांची फसवणूक.
--------------------------------
गांधीनगर प्रतिनिधी
--------------------------------
जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून पाच लाख ८० हजार रुपयांची रेणुका सूर्यकांत बगाडे व इतरांची फसवणूक केल्याबद्दल प्रमोद धोंडी धुरी (वय ३९, मूळ रा. मोरे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, सध्या रा. मस्के निवास, न्यू दत्त कॉलनी, सरनोबतवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याला गांधीनगर बाजारपेठ मध्ये फिर्यादी यांच्या मदतीने गांधीनगर पोलीसांनी अटक केली.
गांधीनगर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,
प्रमोद धुरी हा सरनोबतवाडी येथील मस्के यांच्या घरी भाडेकरू आहे. धुरी याने नजीकच राहणाऱ्या रेणुका सूर्यकांत बगाडे (वय ३६, रा. न्यू दत्त कॉलनी, सरनोबतवाडी) यांच्यासह इतर काही जणांना ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. जुलै २०२४ पासून नऊ सप्टेंबरअखेर त्यांच्याकडून सहा लाख दहा हजार रुपयांची रक्कम रोख व गुगल पे स्वरूपात धुरीने स्वीकारली. त्यानंतर केवळ परतावा म्हणून तीस हजार रुपये बगाडे व इतरांना धुरी याने परत केले. ज्यादा परतावा व मुद्दल रकमेबद्दल वारंवार धुरी याच्याकडे तगादा लावला असता फसवणूक झाल्याची बगाडे यांना खात्री झाली. याबाबत बगाडे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. धुरी याने स्वतःच्या फायद्यासाठी ही रक्कम वापरल्याने त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सदर फसवणुकीचा तपास पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे हे करीत आहेत
सदर आरोपीला मा, न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे .
----------------------------------
गांधीनगर पोलिसांकडून आव्हान,
सदर आरोपी प्रमोद धोंडी धुरी या यांच्याकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास फसवणूक झालेल्या लोकांनी गांधीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आव्हान गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी केले आहे
Comments
Post a Comment