Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना शाहू पतसंस्था व शाहू दुधसंस्थेच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य चेअरमन राजेंद्र मोरे सर.

 स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना शाहू पतसंस्था व शाहू दुधसंस्थेच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य   चेअरमन राजेंद्र मोरे सर.


-----------------------------------------

मुरगूड  प्रतिनिधी

 जोतीराम कुंभार

-----------------------------------------

भविष्यकाळात आपल्या गावातील युवक युवती अधिकारी व्हावेत यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना शाहू पतसंस्था व शाहू दुधसंस्थेच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन शाहू पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र मोरे सर यांनी केले.ते शाहू पतसंस्था व शाहू दुध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू दुध संस्थेचे चेअरमन संजय पाटील होते.

स्वागत व प्रास्ताविक विठ्ठल कुंभार यांनी केले.यावेळी विविध परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच आरोग्य खात्यात निवड झाल्याबद्दल ओंकार पाटील, राज्य राखीव पोलीस दलात निवड झाल्याबद्दल प्रविण पाटील, रेल्वे खात्यात निवड झाल्याबद्दल लक्ष्मण नादवडेकर यांचा सत्कार करण्यात आला.

सलग 25 दिवस पूर आला असताना सुद्धा गावातील पाणीपुरवठा व वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवल्याबद्दल ग्रामपंचायत कर्मचारी गणपती घाटगे, चंद्रकांत घाटगे, तुकाराम बिरंबुळे व वायरमन दीपक पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विठ्ठल कांबळे, सोमनाथ पाटील, उमाजी पाटील, गणपती घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.आभार मोहन घस्ते यांनी मानले.

कार्यक्रमास शहाजी पाटील,शिवराम कांबळे गुरुजी, बाळासाहेब खापरे, गणपती सुतार, प्रकाश डाफळे,केरबा कुंभार, सुप्रिया मस्कर, निवृत्ती पोवार, नामदेव पोवार, कृष्णात मोरे, रमेश खंदारे, रमेश मोरे, पंडित पाटील,साताप्पा मोरे, बाळासाहेब मोरे, शिवाजी मोरे, बाळासाहेब पाटील, सुरेश चव्हाण, तानाजी पाटील, अर्जुन पाटील, अरविंद नादवडेकर, नवनाथ कुंभार, विकास कुंभार, धोंडिराम पाटील, नामदेव गुरव शिवाजी पाटील, पांडुरंग मोरे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments