शस्त्र युद्ध योग अभ्यासाने सर्व रोगा विरुद्ध लढता येते डॉ. प्रशांत कटकोळ.
शस्त्र युद्ध योग अभ्यासाने सर्व रोगा विरुद्ध लढता येते डॉ. प्रशांत कटकोळ.
----------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
----------------------------------------
मिरज: शास्त्रशुद्ध योगाच्या अभ्यासाने सर्व प्रकाराचे रोग बरे होऊ शकतात. सर्व प्रकाराच्या रोगाव विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते व आरोग्यदायी समाधानी असे जीवन जगता येते असे मत न्यूरोसर्जन डॉ. प्रशांत कटकोळ यांनी व्यक्त केले. ते मिरज येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात संपन्न झालेल्या इनरव्हील क्लब ऑफ मिरज आणि रोटरी क्लब ऑफ मिरज यांनी आयोजित केलेल्या योगाचे महत्व या विषयावर बोलत होते.
यावेळी आर एम आय स्कूलचे शिक्षक अशोक मिसाळ यांचा डॉक्टर प्रशांत कटकळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी इन व्हील क्लब ऑफ मिरज च्या अध्यक्ष डॉ. पूजा भोमाज, सेक्रेटरी सौ माधुरी जोशी, तसेच रोटरी क्लब ऑफ मिरजचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र फडके, सेक्रेटरी डॉ. रियाज उमर मुजावर, युथ सर्विस डायरेक्टर मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे व असिस्टंट गव्हर्नर कंपनी सेक्रेटरी अभय गुळवनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment