कुंभोज गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात फंड उपलब्ध करू- खासदार धनंजय महाडिक.

 कुंभोज गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात फंड उपलब्ध करू- खासदार धनंजय महाडिक.

------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीनंतर विकास कामासाठी आवश्यक असणारा फंड देण्याचे आश्वासन कुंभोज जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांना दिले. 

       परिणामी अरुण पाटील परिवार व कुंभोज ग्रामस्थांनी सतत महाडिक परिवारावर मोठा विश्वास दाखवला आहे व अनेक निवडणुकीमध्ये महाडिक परिवाराशी ते ठाम राहिले आहेत. त्यामुळे महाडिक परिवार हा कुंभोज ग्रामस्थांचा ऋणी असून त्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात फंड देण्याचे आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिले 

   कोल्हापूर येथे जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन कुंभोज गावच्या अपूर्ण असणाऱ्या अनेक प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून सदर गोष्टीसाठी आवश्यक असणाऱ्या फंडाची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली. परिणामी अरुण पाटील यांनी आज खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक या दोन्ही खासदारांची भेट घेऊन कुंभोज गावच्या विकासाबाबत चर्चा करून आवश्यक असणाऱ्या निधीची मागणी करून त्याची पूर्तता करावी असे ठामपणे दोन्ही खासदारांना सांगितले यावेळी दोन्ही खासदारांनी आपण आपल्या गावाला लागेल ते सहकार्य करू अशी आश्वासन दिले.

      यावेळी त्यांच्या समवेत युवा नेते अमोल गावडे ,अनिल कोरे, राहुल कत्ते, विनायक पोद्दार, निवास माने, श्रीकांत पालखे, विजय नामे, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब ढोणे विश्वजीत माने, प्रतीक नकाते, मुबारक मुजावर ,गुंन्डा शिंदे, समीर भोकरे, अनिल रकरके,तसेच कुंभोज परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.