करडवाडी परिसरात भावपूर्ण वातावरणात गणेशाला निरोप.
करडवाडी परिसरात भावपूर्ण वातावरणात गणेशाला निरोप.
----------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
स्वरूपा खतकर
------------------------------------
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात खेडेगावातील आज (गुरुवार) सहाव्या दिवशी गणपतीचे वाजत - गाजत विसर्जन करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांनी जड अंतकाराने आपल्या लाडक्या गणेशाला निरोप दिला.
करडवाडी, निष्णप,पारदेवाडी, पाचर्डे या गावातील घरगुती गणेश मूर्तींचे वेदगंगा नदीवर करडवाडी - शेळोली ढवावर सार्वजनिक ठिकाणीच या वर्षी देखील गणेश मूर्तींचे विसर्जन केले. महिला गौरी गितांनी गणेशाला निरोप दिला सकाळपासूनच पावसाने उघडीप दिल्याने मुलांचा उत्साह वाढत होता . मात्र गणेशाच्या निरोपा वेळी पाऊस पडल्याने लहानांपासून वयोवृद्ध लोक व महिला भिजत गणेशाला निरोप देत होते दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील शिवशक्ती तरुण मंडळाच्या कार्यकत्यानी सर्व ग्रामस्थ भक्ताना खीर वाटप करुन आपली सेवा अखंडीत राखली यावर्षी वेदगंगा नदीला पात्राबरोबर पाणी आसल्याने नदीपात्रात विसर्जन नकरता ग्रामपंचायत करडवाडीच्या वतीने गावातून फिरून निर्माल्यदान करण्याचे संदेश दिले व ग्रामस्थांनी निर्माल्यदान केले
फोटो - करडवाडी ग्रामस्थ वेदगंगा नदीत गणेशाचे विसर्जन करताना
Comments
Post a Comment