राधानगरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार व पदाधिकारी मातोश्रीवर दाखल.
राधानगरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार व पदाधिकारी मातोश्रीवर दाखल.
------------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
स्वरुपा खतकर
------------------------------------
शिवसेनेच्या निष्ठावंतलाच उमेदवारी मिळावी हा मतदारसंघ गेले अनेक वर्ष पारंपरिक शिवसेनेचा आहे ह्याच मतदारसंघांमध्ये बंडखोरी झालेली असून बंडखोर यांच्या विरोधात शिवसेनिक असायला हवाअशी लढाई होणे अपेक्षित असल्याचे मत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आज रोजी मातोश्री कडे अनेक जण इच्छुक म्हणून येत आहेत पण त्यासाठी शिवसैनिकांच मत आजमावून घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी मातोश्री बोलावल्याचं काही पदाधिकारी यानि सांगितले शिवसैनिक हा निष्ठावंत असतो त्याला काही मिळो न मिळो पक्षाशी इमानदार असतो पण शिवसेनेला गेले अडीच वर्षांपूर्वी पक्ष फुटी नंतर पोहोचलेली झळ यामुळे शिवसेना सावध पवित्रा घेईल अशी परिस्थिती सध्या दिसते आहे महाविकास आघाडीला लोकसभेचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारामध्ये शिवसेना अग्रेसर होती त्यामुळे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे या ठिकाणी निष्ठावंत उमेदवार देऊन निवडून आणतील अशी खात्री आज गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या कडून ऐकायला मिळते कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हा एकमेव बंडखोराचा मतदारसंघ असून त्या ठिकाणी निष्ठावंतच उभा केला जाईल अशी चर्चा राधानगरीतील राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळते. आगामी काळात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचं नाव एकत्रित मतदारसंघातून घेतले जाते आणि निष्ठावंतला शिवसैनिकाला उमेदवारी मिळावी अशी मागणी सर्व पदाधिकाऱ्यांनी केली राधानगरी मतदारसंघांमध्ये चेहरा नवा पण निष्ठावंत हवा अशा पद्धतीचे डिजिटल फलक प्रकाश पाटील यांचे लागल्याची जोरदार चर्चा आहे त्यामुळे या मतदारसंघात गद्दारीला स्थान राहणार की निष्ठावंतला पुन्हा संधी मिळणार हा चर्चेचा विषय ठरला आहे
Comments
Post a Comment