माळाकोळी येथील संत नामदेव महाराज महाविद्यालयाचा संघ क्रिकेट स्पर्धेत अव्वल तर गोळाफेक स्पर्धेत देवकत्ते प्रथम.

माळाकोळी येथील संत नामदेव महाराज महाविद्यालयाचा संघ क्रिकेट स्पर्धेत अव्वल तर गोळाफेक स्पर्धेत देवकत्ते प्रथम.

--------------------------------

लोहा प्रतिनिधी

अंबादास पवार 

--------------------------------

            तालुक्यातील माळाकोळी येथील संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने तालुकास्तरीय १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातून प्रथम तर गोळाफेक स्पर्धेत देवकत्ते प्रथम येवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

         तालुका क्रिडा स्पर्धेत माळाकोळी येथील संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविद्यालय संघाचा क्रिकेटचा उपांत्य सामना सोनखेड येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया सोबत झाला. माळाकोळीच्या संघाने सोनखेड संघावर मात करत विजय मिळवला. त्यानंतर अंतिम सामना पारडी येथील सह्याद्री विद्यालयाच्या संघासोबत झाला. सदरील सामना केवळ ४ षटकांचा घेण्यात आला. त्यामध्ये नामदेव महाविद्यालयाच्या संघाने प्रथम फलंदाजी करत सह्याद्री विद्यालयाच्या संघासमोर ४१ धावांचे लक्ष ठेवले. परंतू सह्याद्री विद्यालय केवळ २३ धावावरच गारद झाला. अंतिम सामन्यात नामदेव महाराज महाविद्यालयाच्या संघाने तालुकास्तरीय क्रिकेट सामना जिंकून जिल्हास्तरावर पात्र ठरला. तसेच १९ वर्षाखालील गोळाफेक स्पर्धेत संत नामदेव महाराज महाविद्यालयाच्या चंद्रकांत देवकत्ते याने ८.७५ मीटर गोळा फेकून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. 

        तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत विजय मिळवल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. मुंडे, प्रा. ज्ञानेश्वर बिडवई, प्रा. श्रीमती गायकवाड, प्रा. नामदेव मोरे, प्रा. दिलीप मुंडे, क्रिडा विभागाचे प्रा. भागवत गोरे, प्रा. शिवाजी मुंडे, युनूस शेख आदींनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.