सातारकर पाहणार 'धर्मवीर २' चित्रपट मोफत , निलेश मोरे यांचा उपक्रम : पहिल्या दिवसाचे सर्व शो फुल्ल
सातारकर पाहणार 'धर्मवीर २' चित्रपट मोफत , निलेश मोरे यांचा उपक्रम : पहिल्या दिवसाचे सर्व शो फुल्ल.
-------------------------------
सातारा : प्रतिनिधी
-------------------------------
प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा 'धर्मवीर २' चित्रपट प्रदर्शित झाला असून सातारा शहरातील चित्रपट रसिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सेव्हन स्टार चित्रपटगृह येथे दिवसभरातील सगळे शो 'धर्मवीर २' चित्रपट पूर्णपणे मोफत दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा शिवसेना सातारा शहरप्रमुख निलेश मोरे यांच्या प्रयत्नातून प्रायोजित करण्यात आला आहे. सदर शो साठी आ. महेश शिंदे व जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय मोरे यांचे योगदान लाभले आहे.
धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल लहान पणा पासूनच आदर वाटत आला आहे. त्यांचे हिंदुत्वनिष्ठ विचार, परखड बाणा आणि संघर्षमय जीवन शिवसैनिकांसाठी नेहमीच प्रेरणादाई राहिले आहे. त्यांच्या कार्याचं ऋण फेडण्याचा आणि नव्य पिढीला त्यांच्या जीवनाची ओळख करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. हा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात असून यापूर्वी चा देखील धर्मवीर चित्रपट आम्ही सातारा शहरातील नागरिकांसाठी मोफत दाखवण्यात आला होता, अशी माहिती निलेश मोरे यांनी दिली. तसेच रविवारी पहिल्या शो चे उद्घाटन आ. महेश शिंदे, डॉ. प्रियाताई शिंदे, डॉ. अरुणाताई बर्गे, मिनाक्षीताई मोरे यांच्या उपस्थित होणार आहे. पारंपरिक वाद्य व फटाक्यांची आतषबाजी करून शो ची सुरुवात करण्यात येणार आहे. सातारा शहरातील शिवसैनिकांसाठी हा एक खास क्षण असून, सर्वांना या चित्रपटाचा आनंद लुटण्याची सुवर्ण संधी आहे. तरी याचा लाभ सर्व सातारा वासियानी घ्यावा असे शिवसेना शहर कार्यालयाकडून सांगण्यात आले.
Comments
Post a Comment