राधानगरी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत म्हासुर्ली हायस्कूल प्रथम ! जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड.

 राधानगरी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत म्हासुर्ली हायस्कूल प्रथम ! जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड.

-------------------------------------     

कौलव प्रतिनिधी

संदीप कलिकते

-------------------------------------                   

                  १७ वर्षे वयोगटाखालील राधानगरी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत म्हासुर्ली हायस्कूल म्हासुर्ली  या माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला असून आवळी बुद्रुक ता राधानगरी येथील आवळी बुद्रुक हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला म्हासुर्ली हायस्कूलची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली असल्याचे तालुका खेळप्रमुख मुख्याध्यापक एन के पाटील यांनी सांगितले.

            ज्येष्ठ क्रीडा शिक्षक एस के पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले ..अध्यक्षस्थानी खेळ प्रमुख मुख्याध्यापक एन के पाटील होते स्वागत हेमंत वारके यांनी केले .तालुका क्रीडाध्यक्ष एम बी पाटील यांनी प्रास्ताविक केले यावेळी जिल्हा परिषदेचा श्री राजर्षी शाहू आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वर्गीय गोविंदरावजी तुकाराम कलिकते दूध संस्थेचे चेअरमन क्रीडाशिक्षक मधुभाऊ किरुळकर यांचा व यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक एन के पाटील ,ज्येष्ठ समन्वयक बी एस जठार ,श्रीधर खोराटे ,आर एल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

                     व्ही. टी .पाटील, सुनील संकपाळ, आर पी जाधव ,सुनील कांबळे, विकास तोरस्कर ,टी एल किल्लेदार ,डी एस एरुडकर ,अरुण पाटील मुख्याध्यापक अंकुश पाटील ,जे एम पोवार आर एस पाटील, आर एल पाटील ऋषिकेश पाटील, माजी मुख्याध्यापक पी एल पाटील. आदी क्रीडा क्षेत्रातील क्रीडाशिक्षक उपस्थित होते .एस के लाड यांनी आभार मानले .


👍 फोटो 👍राधानगरी तालुकास्तरीय कबड्डी प्रथम क्रमांकाचे मानकरी म्हासुर्ली हायस्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या समवेत राधानगरी तालुका क्रीडा शिक्षक संघटनाचे पदाधिकारी.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.