Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दाटे येथे गौरी गणपती ची गाण्यांची १०० वर्षाची परंपरा.ताम्रपर्णीच्या काठवर घुमतोय काटवटीचा आवाज.

 दाटे येथे गौरी गणपती ची गाण्यांची १०० वर्षाची परंपरा.ताम्रपर्णीच्या काठवर घुमतोय काटवटीचा आवाज.

------------------------------

चंदगड प्रतिनिधी 

आशिष पाटील 

------------------------------

दाटे (चंदगड )  वाढत्या शहरीकरण आणि धकाधकीच्या जीवनात अलीकडे गौरी गणपती गाण्यांचा विसर पडल्या सारखा वाटतो. पण आज सुद्धा दाटे येथे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंत दररोज एका घरात गौरी गणपती ची गाणी म्हटली जातात. ही शंभर वर्षाची परंपरा आजसुद्धा अखंडीत सुरु आहे. आजी पासून सुना, नातवंडांनी ही परंपरा सुरु ठेवली आहे.

महाराष्ट्राची पारंपारीक लोककला म्हणजे काटवटीवरची गाणी,गौरीच्या कान उघडणीची गाणी,गणपतीची फेऱ्याची गाणी, झिम्मा फुगडी, निसरट फुगडी, घणा घालणे, घागर घुमु दे असे वेगवेगळ्या खेळ प्रकाराने रात्री 

 जागवल्या जातात.

यामध्ये

सौ.अनिता देसाई,शालन साबळे, 

साधना देसाई,सुनिता देसाई,रेखा देसाई,

मंजूळा साबळे,सरस्वती साबळे,शांताबाई साबळे,मुक्ताई देसाई या महिला परिश्रम घेतात.

Post a Comment

0 Comments