" चंद्रकांत दरेकर " यशस्वी उद्योजकाकडे झेप घेणारे व्यक्तीमत्व - पी डी मगदूम.

 " चंद्रकांत दरेकर " यशस्वी उद्योजकाकडे झेप घेणारे व्यक्तीमत्व - पी डी मगदूम.

-------------------------------------

मुरगूड प्रतिनिधी

जोतीराम कुंभार

---------------------------------------

मुरगूड भोईगल्ली येथिल चंद्रकांत दरेकर हे यशस्वी उद्योजकाकडे झेप घेणारे व्यक्तीमत्व आहे . त्यानी कठीण परस्थितीतून आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगली प्रगती केली आहे . त्यांचा नावलौकिक सर्वदूर पसरला आहे असे गौरवउदगार पी.डी. मगदूम यानीं काढले .

ते मुरगूड येथिल जेष्ठ नागरीक विरंगुळा केंद्राच्या २०५ व्या वाचन कट्याचे निमित्य व चंद्रकांत दरेकर यांच्या ६८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बोलत होते .

या प्रसंगी दरेकर यांचा शाल , श्रीफळ , गुच्छ देऊन जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला . यावेळी दरेकर यानीं जेष्ठ नागरीक संघाकडे ६ खुर्चीचा सेट सूपूर्त केला .

या कार्यक्रम प्रसंगी संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे सर , जयवंत 

हावळ, किरण गवाणकर , विनायक हावळ, भगवान गुरव , लेखक पांडूरंग पाटील , सखाराम सावर्डेकर , महादेव वाघवेकर यांच्यासह जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.