अजयकुमार सतीशराव माने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या सेवा निवृत्तीच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या कामाचा अल्पसा परिचय

 अजयकुमार सतीशराव माने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या सेवा निवृत्तीच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या कामाचा अल्पसा परिचय

-----------------------------

शशिकांत कुंभार

--------------------------------

मिरज मध्ये दिनांक ३०/०९/१९६६ जन्म घेतलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्या सेवा निवृत्तीच्या निमित्ताने त्यांनी आपल्या कारकीर्दीत केलेल्या कामकाजाचा आल्पसा परीचय आम्ही आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र व दैनिक सुपर भारत मध्ये प्रसिद्ध करत आहोत 

अजयकुमार माने यांचे मूळ गाव  बस्तवडे ता- तासगाव जि.सांगली

त्यानी आपलं शिक्षण बी. ई. सिव्हील, एम ई स्ट्रक्चर, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली १९८७. शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम पुर्ण केल्यानंतर  डिझाईन कन्सल्टंट सहायक सांगली येथे एक वर्ष १९८७-८८ पदभार स्वीकारला 

१९८८-८९ एम ई दूर संचार विभाग, मुंबई, कोल्हापूर येथे कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून १९९० गटविकास अधिकारी वर्ग-१ पदावर निवड - जुलै १९९२ मध्ये सेवेत रुजू.

१. गटविकास अधिकारी म्हणून कोल्हापूर व सांगली जिल्हयात एकूण पाच पंचायत समितीमध्ये कामकाज. यामध्ये गडहिंग्लज, खानापूर- विटा, तासगाव, हातकणंगले, मिरज असे ९ वर्षे कामकाज.

२. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग म्हणून सांगली व कोल्हापूर येथे एकूण ५ वर्षे कामकाज केले.

३. त्यानंतर प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा म्हणून १४ वर्षे कामकाज केले. यामध्ये सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर येथे कामकाज

४. तसेच, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी) म्हणून जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे गेली साडेचार वर्ष कामकाज.

एकूण राज्य शासनाच्या सेवेत ३२ वर्षे २ महिने सेवा केली.उल्लेखनीय कामे

१. १९९३ ते ९५ मध्ये गडहिंग्लज पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून काम करताना पं स पुणे विभागात विकास कामे अंमलबजावणीत सर्वप्रथम.

२.पं स तासगाव १९९६ ते १९९९ येथे गटविकास अधिकारी म्हणून काम करताना तालुक्यामध्ये वाडया वस्त्यांवर पाणीपुरवठा योजना राबवून तालुका टँकरमुक्त केला.

- ३. पंचायत समिती हातकणंगले पंचायत समिती मुख्य इमारतीचा पहिला मजला हातकणंगले ग्रामसचिवालय बांधकाम पूर्ण.

४.पं स मिरज येथे गटविकास अधिकारी म्हणून काम करताना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या पहिल्याच वर्षी सन २००० मध्ये तुंग ता. मिरज हे गाव जिल्हयात सर्वप्रथम व पुणे विभागात व्दितीय क्रमांक पुरस्कार प्राप्त व त्यामुळे ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून एक आगाऊ वेतनवाढ देऊन गौरव केला.

५. उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण म्हणून सांगली व कोल्हापूर येथे काम करताना ICDS प्रकल्प फक्त एक तेदोन तालुक्यात कार्यरत होते. जागतिक बँक अर्थसहायित अनुदानातून दोन्ही जिल्हयात सर्व तालुक्यात प्रकल्प कार्यान्वित केले व उघडयावर भरणाऱ्या सर्व अंगणवाडींना इमारती बांधकामाची मोहिम राबविली.

६. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा म्हणून चार जिल्हयात (सांगली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग व कोल्हापूर) एक लाखाहून अधिक बेघरांना घरकूल बांधून दिली. तसेच महिला बचत गटांना दहा हजाराहून अधिक गटांना ५०० कोटी रुपयाहून अधिक बैंक अर्थसहाय उपलब्ध करुन दिले. दरवर्षी महिला बचत गटांच्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन २००९ पासून २०२० पर्यंत १२ प्रदर्शनांचे आयोजन व अडीच कोटीहून अधिक रुपये किमतीच्या साहित्यांची विक्री.

७. उल्लेखनीय : पारधी समाजाला सांगली जिल्हयात जत पांडोझरी पारधी वस्ती येथे ५० घरकुलांची वसाहत व कोल्हापूर येथे उंचगाव येथे शांतीनगर येथे २५ घरकुलांचे वसाहतीत घरकूल योजनेतून मंजूर करुन उपलब्ध करुन दिली.

८. अतिमुकाअ i) यशवंत पंचायत राज वर्ष २०२० २१ अभियानात जिल्हा परिषद, कोल्हापूर राज्यात सर्वप्रथम तसेच २०२१-२२ मध्ये केंद्र सरकारने केलेल्या मूल्यमापनात पंडीत दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियानात कोल्हापूर जिल्हा राज्यात सर्वप्रथम सन २०२२-२३ मध्ये यशवंत पंचायत राज अभियानात राज्यात व्दितीय क्रमाक

जिल्हा परिषद चौथ्या मजल्याचे बांधकाम पूर्ण व उदघाटन कार्यक्रम घेऊन वापरात आणल स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उल्लेखनीय काम केलेबददल मे २०१७ मध्ये मुंबई येथे आयोजित कार्यक्रमास जेष्ठ सिनेअभिनेता महानायक श्री. अमिताभ बच्चन यांचे हस्ते श्री. अजयकुमार माने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.