Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांना समाजशील शिक्षकाने लावला लळा.

 आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांना समाजशील शिक्षकाने लावला लळा.

----------------------------------------

कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार

----------------------------------------

मोहन सातपुते यांच्या सहज, निखळ ,आनंदी शिक्षणाने मुलांना पडली भुरळ!!

 मस्त शिकवलतं. सहज समजलं, खूप मज्जा आली सर!!

शाळा, खडू, फळा, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यां हे आनंददायी शिक्षणातील अंतर्बाह्य उजळून निघालेली प्रबोधनाची विचारपीठ आहेत.विद्येच्या माहेर घरात सरस्वतीचे मंजुळ स्वर बोलले जातात.महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या ज्ञानदानाची क्रांतीकारी शिदोरी शाळेत उलगडली जाते.अभ्यासक्रमातील शिक्षकांनी विविधांगी शिकवलेले पुस्तकांतील धडे  जीवनाला आकार देतात.आचार, विचार, सुसंस्कार, आणि परिसर यामुळे विद्यार्थ्याची सामाजिक जडणघडण होते. संविधानाच्या मूलभूत 

हक् आणि अधिकाराने शिक्षण हे वाघिणीचे दूध पिणारी  पिढी तयार होत आहे.प्रबोधनात्मक शिक्षण हे समाज उन्नतीचे माध्यम बनत आहे. आज सोशल मीडियामध्ये गुंतलेले पालक लहानग्याच्या हाती मोबाईल देऊन स्क्रीन टच वर  मुलांना खेळवून ठेवत आहेत.यामुळे लहान मुलेही नेटकरीत गुंतली आहेत.



 मुलेही देवाघरची फुले असतात. ती जीवनाचे रहस्य उलगडत असतात.आपल्या बोबड्या बोलण्यानं सर्वांना आपलंसं करत असतात.अश्या लहान मुलाना संस्कार गीते ,अभिनय गीते, बडबडगीते, आनंददायी शिक्षणातील प्रबोधनात्मक गीते शिकवणाऱ्या उजळाईवाडी तालुका करवीर येथील समाजशील शिक्षक मोहन गणपती सातपुते यांच्या चांगुलपणाच्या शिकवणीमुळे लहानग्या मुलांना त्यांनी भुरळ घातली आहे. त्यांच्या कौशल्येपूर्ण व अभिनयमय सादरीकरणमुळे बडबडगीतकार  म्हणून लहानग्या मुलांच्या ह्रदयात त्यांनी स्थान मिळवले असून मुलाना त्यांच्या आनंददायी प्रार्थना परिपाठचा लळा लागला आहे. आनंददायी शिक्षणातून ते ज्ञानगंगोत्री घरोघरी पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम करत आहेत.

सलग सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प - अगंणवाडी कार्यकर्ती प्रशिक्षण केंद्राकडे १२ वर्ष शिक्षक म्हणून काम पाहिले आहे. आदर्श जीवन शैली आणि सुसंवाद यामुळे हजारो विद्यार्थी, अगंणवाडी सेविका, मदतनीस घडल्या आहेत. त्यांच्या समाज मनातील कार्याची नेहमीच समाजाने दखल घेतली आहे.






चौकट:

शाळा बाह्य मुले, ऊस तोडणी कामगारांची, वीट भट्टी कामगारांची, असंघटित कामगारांच्या मुलांसाठी विविध उपक्रम राबवित असतो. युवा ग्रामीण विकास संस्था आरोग्य प्रतिबंध विभाग गोकुळ शिरगाव मार्फत अश्या मुलाना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रेरणादायी काम राहिले आहे.


चौकट: गेली १७ वर्ष एच आय व्ही एड्स गुप्तरोग क्षयरोग कावीळ जनजागृतीचे ते काम करीत आहेत. त्यांच्या कामामुळे समाजातील असंख्य लोकांचे प्रबोधन करण्यात यशस्वी झाले आहेत.


चौकट:


खऱ्या अर्थाने रामराव बेनाडीकर सरकार यांनी आपल्या घरी ठेवलं, शिक्षणाचा श्री. गणेशा विचारे विद्यालय, कोल्हापूर, गारगोटी हायस्कूल गारगोटी, कर्मवीर हिरे महाविद्यालय, समाज कार्य महाविद्यालय सायबर पर्यंत येऊन थांबला.अण्णाभाऊ साठे वस्तीगृह गारगोटी, अमरनाथ कांबळे विद्यार्थी वस्तीग्रहात राहिलो, प्राचार्य आर एस कांबळे, दलित मित्र बी डी कांबळे, पोलिस पाटील प्रदीप थडके यांनी मदतीचा हात दिला. रस्त्यांवर गारेगार विकणे, हॉटेलात सफाई कामगार ते वेटर , शेतावर मजूर म्हणून काम करत शिक्षण घेतलं. त्यामुळे घडता आलं.



चौकट:

 घरचे अठरा विश्व दारिद्र्य, आई खेड्या पाड्यात वस्तीवर खेट्टर (चप्पलाना ठिगळं लावायला जायची, शेर, पाईली, अडीसरी धान्य आणायची, चुलीवर रांधायची तवा कुठ आमची पोट भरत असतं, वडील शाहिरी गाण्याच्या प्रेमात पडले ते लोकशाहीर झाले.

शिक्षणातून बालकांचा सर्वागीण विकास साधण्यासाठी ते अंग णवाडी सेविका पासून प्राथमिक माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण देतात. यापूर्वी सर्व शिक्षा अभियान,८२९ प्राथमिक माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. युथ पिअर एज्युकेशन प्रोग्रामच्या माध्यमातून सलग पाच वर्ष ३२ माध्यमिक व ३२ वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीना मार्गदर्शन केले आहे.

मोहन सातपुते 

समाज शिक्षक 

फोटो ओळ: प्रार्थना परिपाठ, अभिनय गीते, बडबड गीते, यामधून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाचे धडे देताना समाज शिक्षक मोहन सातपुते

Post a Comment

0 Comments