तावडे हॉटेल परिसरातील सतत होणारी वाहतुक कोंडी सोडवा-करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष.
तावडे हॉटेल परिसरातील सतत होणारी वाहतुक कोंडी सोडवा-करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष.
तावडे हॉटेल चौकामध्ये सतत वाहतुकीची कोंडी होत असते. पुणे-मुंबईसह हायवेवरून कोल्हापूर मध्ये तावडे हॉटेल मार्गे शहरात प्रवेश करत असतात. तावडे हॉटेल चौकामध्ये शहर विभागातील वाहतुक पोलिस नसल्याने दिवसातून अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होत असते हीकोंडी सरळ मुख्य हायवेवर तसेच शहर विभागातील मुख्य कमान या दोन्ही बाजूला वाहनांच्या भल्या मोठया रांगा लागतात गांधीनगरच्या बाजूला गांधीनगरचे वाहतूक पोलिस शाखेचे दोन ते तीन वाहतुक पोलिस सतत असतात पण सदर चौकामध्ये तावडे हॉटेलच्या शहराकडील बाजूस शहरातील वाहतुक पोलिस शाखेचे कोणतेही वाहतूक पोलिस नसल्याने गांधीनगरला खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांचे सतत होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे अडथळा होत आहे. सतत होणाऱ्या या वाहतुक कोंडीमुळे उचगांवच्या शेतकऱ्यांनाही निगडेवाडी पंचगंगा नदी परिसरातील असणाऱ्याआपल्या शेतामध्ये जाताना वाहतुक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. आता तर दसरा व दिवाळीमध्ये कोल्हापूर शहरात पर्यटकांची येण्याची संख्या मोठी असल्याने होलसेल व रिटेल बाजारपेठ असल्याने येथेही खरेदीसाठी जिल्हयासह परजिल्हयातून येणाऱ्यांची संख्यामोठी आहे. तावडे हॉटेल चौकामध्ये शहर वाहतुक शाखेच्या दोन ते तीन पोलिसांची नेमणुक करावा व सतत होणाऱ्या वाहतुक कोंडीचे योग्य नियोजन करावे तावडे हॉटेल परिसरातील सतत होणाऱ्या कोंडीवर आपण योग्य उपाययोजना केली नाही तर तावडे हॉटेल परिसरात करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार याची शहर वाहतुक शाखेने नोंद घ्यावी. याबाबतचे निवेदन *शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे साहेब* यांना याबाबतचे निवेदन तावडे हॉटेल चौकामध्ये देण्यात आले. करवीर तालुका प्रमुख राजू यादव बोलताना म्हणाले की कोल्हापुरात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे व गांधीनगरला खरेदीसाठी जाणाऱ्यांची वाहनांची संख्या ही मोठी आहे,सदर पुलाखाली दिवसभरातून अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होते हे निदर्शनास आणून दिले संबंधित अधिकाऱ्यांनी कोल्हापूर शहर वाहतूक शाखेचे पोलीस येथे उपलब्ध ठेवून वाहतुकीची कोंडी होणार नाही याबाबत शिवसेनेला आश्वासन दिले. यावेळी उपस्थित करवीर तालुकाप्रमुख राजू यादव,
दिपक रेडेकर, शरद माळी, राजेंद्र पाटील, बाळासाहेब नलवडे, आबा जाधव, राकेश फराकटे, बाबुराव पाटील, प्रफुल्ल घोरपडे आदींनी अधिकाऱ्यांना वाहतुकीच्या कोंडीच्या समस्या बाबत तावडे हॉटेल चौकामध्ये निवेदन दिले.
Comments
Post a Comment