मेळघाटात रुग्णवाहिके अभावी गर्भवती माता बाळासह दगावली! चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री येथील घटना आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर

 मेळघाटात रुग्णवाहिके अभावी गर्भवती माता बाळासह दगावली! चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री येथील घटना आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर.

-------------------------------

 फ्रंट लाईन् न्यूज महाराष्ट्र.

अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

पी.एन देशमुख.

-------------------------------

अमरावती (मेळघाट).

(चिखलदरा चुरणी)

बाळ आणि माता मृत्यूच्या घटनेमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या मेळघाटाच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दहेन्द्री या गावातील एका गर्भवती महिलेला वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने तिची घरीच प्रसूती झाली

यामध्ये तिच्या बाळाचा मृत्यू झाला. तर प्रसूतीमध्ये प्रकृती बिघडलेल्या त्या वीस वर्षीय मातेचा हिरवींच्या आय सी यु विभागात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने मेळघाटातील आरोग्य सुविधेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मेळघाटातील आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर आहे. आजही येथील दुर्गम भागातील रहिवाशी नागरिकांना उपचार सुविधा उपलब्ध होत नसल्याचे चित्र अजून कायम आहे. चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री या गावातील रहिवासी कविता साकोम वय २० ही गर्भवती महिलेला शनिवारी सकाळपासून प्रसृतेच्या कळा सुरू झाल्या होत्या. यावेळी या महिलेच्या नातेवाईकांनी याची माहिती देत रुग्णवाहिकेची मागणी आरोग्य विभागास केली होती. परंतु रुग्णवाहिका येण्यास तीन ते चार तासाचा वेळ लागणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. अखेर या महिलेची घरीच प्रसूती झाली. परंतु तिचे बाळ मृत जन्माला आले. नंतर कवितेची प्रकृती बिघडत असल्याने तिला लगेच खाजगी वाहनाने चूर्णी रुग्णालयात आणण्यात आले. परंतु तिची प्रकृती जास्तच बिघडत असल्याने तिला तिथून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. परंतु कविता उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे पाहून येथूनही तिला जिल्हा सामान्य रुग्णालय (ईरवीन) येथे अडमिट करण्यात आले मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास कवितेला घेऊन तिचे नातेवाईक रुग्णालयात आले येथे तिला तपासणी करून वेळेत आय सी यु मध्ये ठेवण्यात आले परंतु रविवारी पहाटे ६ वाजता कविताचा मृत्यू झाला. प्रसूतीच्या वेळीच रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली असती तर कविता व तिचे बाळही वाचले असते असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पत्नीला प्रसूती काळ सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिकेसाठी काल केला होता परंतु एकही रुग्ण वाहिका मिळाली नाही, त्यानंतर पतिने पत्नीला दवाखान्यात नेण्याकरिता रुग्णवाहिका नसल्याने खाजगी वाहनाने तिला चूर्णी येथे उपचार करिता नेले होते. परंतु तेथून अचलपूर नंतर अमरावती रेकॉर्ड करण्यास सांगितले जर वेळीच रुग्णवाहिका मिळाली असती तर कविता आणि तिचा बाळही वाचले असते असा आरोप नातेवाईकांनी केला. रुग्णवाहिका मिळाली नसल्याने खाजगी वाहनाने तिला चूरणी येथे नेले होते परंतु तेथून अचलपूर नंतर अमरावती रेफर करण्यात सांगितले जर वेडीच रुग्णवाहिका माझी पत्नी व बाळाचाही जीव असला असता असे तिचे पती अनिल साकोम यांनी आमच्या अमरावती जिल्हाप्रतिनिधी जवळ बोलताना आपली व्यथा सांगितली

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.