ध्वनी प्रदूषण आणि वाहनात बेकायदीशीर बदल केल्याने शाहूपुरी पोलिसांनी डॉल्बी वाल्यावर केली कारवाई.

 ध्वनी प्रदूषण आणि वाहनात बेकायदीशीर बदल केल्याने शाहूपुरी पोलिसांनी डॉल्बी वाल्यावर केली कारवाई.

-------------------------------------------

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

अमर इंदलकर 

---------------------------------------

 पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, यांनी पोलीस निरीक्षक  राजेंद्र सावंत्रे शाहुपुरी पोलीस ठाणे यांना शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गणपती आगमण सोहळयामध्ये मोठयाने डॉल्बी लावून ध्वनी प्रदुषन अधिनियम 2000 चे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी मालकांवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे दि.01/09/2024 रोजी शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गणपती आगमन सोहळामिरवणुक दरम्यान सह्याद्री गणेश तरुण मंडळ, कर्तव्य ग्रुप गणेश तरुण मंडळ, अजिंक्य तारा गणेश मंडळ या मंडळाचे समोर वाजविण्यात आलेल्या डॉल्बी चालकावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 सुधारीत 2012 प्रमाणे संबंधितावर मा. न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच दि.02/09/2024 रोजी भुई गल्ली तरुण मंडळ ढोणे कॉलनी सातारा यांचे गणपती आगमन सोहळा मिरवणुक राजवाडा ते देवी चौक अशी सार्वजनिक रोडवर मिरवणुक घेवुन जात असताना भुई गल्ली तरुण मंडळ यांनी पाटील प्लस साऊंड सिस्टीमचा टेम्पो एम.एच.11 एफ-3147 वर लावुन सार्वजनिक रोडवर मोठमोठयाने वाजवुन ध्वनी प्रदुषणाचे उल्लंघन केले असल्याने शाहुपुरी पोलीस ठाणे चे बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर साऊंड सिस्टीमचा ध्वनी मापक यंत्राद्वारे मोजनी करुन सदर साऊंड सिस्टीम मालकावर ध्वनी प्रदुषन अधिनियम 2000 प्रमाणे योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणेत आलेली आहे. तसेच टेम्पो एम.एच.11 एफ-3147 या वाहन मालकाने वाहनाचे चेसी व बॉडीमध्ये बेकायदेशीर बदल केला असल्याने सदरचे वाहन पुढील कारवाई कामी मा.उप- प्रादेशीक परिवहन कार्यालय येथे जमा करणेत आलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.