जेष्ठा गौरी पूजनानिमित्त रानभाज्या संवर्धन कार्यक्रम.

 जेष्ठा गौरी पूजनानिमित्त रानभाज्या संवर्धन कार्यक्रम.

-------------------------------

रिसोड प्रतिनिधी

रणजीत सिंह ठाकुर 

------------------------------- 

महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठा गौरी आव्हानापासून तर विसर्जनापर्यंत घराघरांमध्ये सर्वच लहान-थोर मंडळीची लगबग दिसून येते.ज्येष्ठा गौरीच्या प्रतिष्ठापनेमध्ये विविधता जरी असली तरी वेगवेगळ्या १६  कच्च्या भाज्या एकत्रित शिजवून खाण्याचा पूर्वापार चालत आलेल्या रुढी परंपरेमध्ये मात्र साम्यता आढळून येते.प्राचीन काळी मानवाला फक्त ऋतुमानानुसार आंबाडी,चवळाई,शेपू,खडकशेपु,रान भेंडी,पाथरी,तरोटा,तांदुळजा,कर्टुले,गोखरू,आगाडा,केना,घोळ,तोंडले,हडसन,गोंधन फुलोरा,वाघाटे,समुद्र वेल,कपाळ फोडी,उंबर ,फांज इत्यादी भाज्यांची उपलब्धता निसर्गाकडून होत आली आहे ,असे मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन महादेव आप्पा मुलंगे ह्यांनी जेष्ठा गौरी पुजनाच्या निमित्ताने भक्तगणा समक्ष व्यक्त केले.विशेष बाब म्हणजे उपरोक्त अनेक भाज्यांची उत्पत्ती ऋतुमानानुसार होत असुन ह्यावर कोणत्याची प्रकारची रासायनिक फवारणी होत नाही त्यामुळे ह्या भाज्या मध्ये कमालीची पौष्टिकता व रोगप्रतिकारक क्षमता सामावलेली असते.त्यामुळे जेष्ठा गौरीच्या पूजनानिमित्त फक्त एकच दिवस  १६ भाज्यांचे सेवन न करता ऋतुमानानुसार नैसर्गिक रित्या निर्माण होणार्या प्रत्येक भाज्यांचे सेवन केल्या गेले पाहिजे हा सदर्हु सणाच्या दृष्टिकोनातून दिल्या गेलेला संदेश समजून घेणे अपेक्षित आहे.आधुनिक पिढीला मोजक्या रानभाज्या सोडल्या तर उर्वरित भाज्यांची ओळख सुध्दा नाही,हे तेवढेच खरे.भरीस-भर म्हणुन सद्यस्थितीत तण-नाशकाच्या फवारणी मुळे आहेत त्या भाज्यांच्या प्रजाती समुळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत हि फार गंभिर व चिंताजनक बाब आहे.त्यामुळे निसर्गाने मुक्त हस्ते आपल्या पदरात टाकलेल्या हजारो रानभाज्यांचे अस्तित्व टिकविण्याच्या दृष्टिकोनातून बळी राजाला ग्राहक म्हणुन सुजाण नागरिकाने आर्थिक रूपाने भरभरून मदत करावी,तसेच शेतकर्यांनी सुध्दा शेताचा एक कोपरा अश्या दुर्मिळ रानभाज्या करिता आरक्षित ठेवावा.उपरोक्त दुर्मिळ रानभाज्यांची दखल जर सद्यस्थितीत घेतल्या गेली नाही तर आजरोजी रानोमाळ हिरव्याकंच दिसणार्या भाज्या फक्त  काळ्याकुट्ट अक्षरांनी कागदावर शिल्लक राहतील ह्यामध्ये तिळमात्र शंका नाही.जेष्ठा गौरी पुजनासाठी डॉ.शुभांगी मुलंगे,लता घोडेकर, सुवर्णा थोरात,सोनाली मुलंगे ,किर्ती थोरात , मोक्षदा बरडे ,रक्षा मुलंगे ,वैष्णवी घळे , गौरी पायघन व इतर पुरुष मंडळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.