तर पुढची दहीहंडी पाच लाखाची असेल युवराज येडूरे यांचे दहीहंडी प्रेमींना आश्वासन
तर पुढची दहीहंडी पाच लाखाची असेल युवराज येडूरे यांचे दहीहंडी प्रेमींना आश्वासन.
------------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
स्वरुपा खतकर
------------------------------------
गारगोटीतील मनसेची दहीहंडी, उत्तुरच्या संयुक्त भगवा प्रतिष्ठान पथकाने फोडली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठेवण्यात आलेली हिंदवी - स्वराज्य दहीहंडी हॉटेल तडकाचे मालक प्रमोद महाजन यांच्या संयुक्त भगवा प्रतिष्ठान उत्तुर पथकाने फोडून एक लाख एक रुपयाचे बक्षीस मिळवले
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण व स्वराज्य संस्था आयोजित युवराज येडूरे यांच्या नेतृत्वाखाली राधानगरी विधानसभा मतदारसंघातील पहिली मानाची हिंदवी - स्वराज्य दहीहंडी ठेवण्यात आली होती. प्रारंभी मनसेचे युवराज येडूरे यांचे ग्राउंड वरून वाजत गाजत स्वागत करण्यात आले.
रासलिंग तरुण मंडळ राशिवडे व संयुक्त भगवा प्रतिष्ठान उत्तूर पथकांनी प्रथम थर लावून सलामी दिली. त्यानंतर प्रत्यक्ष दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
संयुक्त भगवा प्रतिष्ठान मंडळ उत्तुर या पथकातील
संदेश पाटील या गोविंदाने रात्री दहाच्या सुमारास हंडीचा अचूक वेध घेतला आणि मौनी विद्यापीठ मैदानात एकच जल्लोष साजरा झाला. दरम्यान चार तासांहून अधिक काळ गोविंदांचा थरार भुदरगड वासियांनी व दहीहंडी प्रेमींना अनुभवायला मिळाला.हिंदवी स्वराज्य दहीहंडी उत्सवाच्या प्रसंगी राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे नेते युवराज येडूरे यांनी येणाऱ्या विधानसभेची नवी पहाट नवा बदल, नवा चेहरा हिच विजयाची दहीहंडी फोडून सुरुवात करत आहे, २०२५ ला आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पुढच्या वर्षी पाच लाखाची दहीहंडी आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले .यावेळी
हलगी पथक, नृत्याविष्काराने दहीहंडी उत्सवाची रंगत वाढली. पावसाच्या सरी झेलतच हा सोहळा कोणतेही गालबोट न लागता पार पडला
या कार्यक्रमासाठी मतदारसंघातील सर्व राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी तसेच सौरभ कांबळे अमित कोरे वृषभ आमते प्रवीण मनुगडे प्रथमेश भोईटे दीपक जरग प्रवीण कांबळे मारुती केसरकर सचिन आरडे राहुल पाटील आकाश पाटील या मनसे सैनिकांचे सहकार्य लाभले
Comments
Post a Comment