भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांनी देशाच्या अभियांत्रिकी क्षेत्रात अद्वितीय कामगिरी बजावली.
भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांनी देशाच्या अभियांत्रिकी क्षेत्रात अद्वितीय कामगिरी बजावली.
------------------------------------
मुरगूड / प्रतिनिधी
------------------------------------
मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांची जयंती अभियंता दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू फर्नांडिस होते .
प्रारंभी संचालक एम टी सामंत यांनी सर्वांचे स्वागत केले . डॉ विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन शाहू फर्नाडिस यांच्या हस्ते करण्यात आले . तर उपस्थितांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले .
यावेळी शाहू फर्नाडिस , महादेव करडे , श्रीपतराव खराडे , सदाशिव एकल , महादेव वाघवेकर , पांडूरंग चौगले , संभाजीराव आंगज , बाळासाहेब सुर्यवंशी , सुधीर गुजर , मयुर गुजर , जयकुमार गुजर या अभियंत्यांना गुलाबपुष्प देवुन सन्मानित करण्यात आले .
यावेळी पांडूरंग चौगले , संभाजीराव आंगज यांनी डॉ विश्वेश्वरय्या यांचे कार्य देशवासियांना प्रेरणादायी असल्याचे मनोगतातून व्यक्त केले . याप्रसंगी सुधीर गुजर ,पांडूरंग चौगले यांनी ज्येष्ठ नागरिक संघास आर्थिक मदत देत संघाच्या कार्यास हातभार लावला .
यावेळी संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे ,शिवाजीराव सातवेकर ,गणपती शिरसेकर ,
रंगराव चौगले , सिकंदर जमादार , विनायक हावळ , तुकाराम भारमल,चंद्रकांत जाधव,शिवाजी कांबळे , बापुसो गुजर,पांडूरंग मेंडके,लक्ष्मण गोधडे,सर्जेराव गोधडे , सदाशिव यादव , दादू मडिलगेकर , रामचंद्र रणवरे , दादू बरकाळे , प्रदीप वर्णे आदि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते .संचालक जयवंत हावळ यांनी प्रास्ताविक केले . रामचंद्र सातवेकर यांनी आभार मानले
Comments
Post a Comment