बहिरेवाडीत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या वारेमाप पैशाच्या मागणी चौघेजण अटकेत.

 बहिरेवाडीत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या वारेमाप पैशाच्या मागणी चौघेजण अटकेत.


पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी बाबुपार्क काँलनीतील प्रियंका रणजित पाटील (वय ३१) या विवाहितेची सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात फँनला  साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणात पती,सासू,दीर आणि जाऊ या चौघांना अटक करण्यात आली.



कोडोली पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीमध्ये काही दिवसांपूर्वी पहिले ५ लाख रुपये देऊनही आणखीन ५ लाख रुपयाची माहेरहून आणण्याची मागणी करण्याबरोबरच वारंवार शिवीगाळ आणि मारहाणीच्या जाचक त्रासाला कंटाळून बहिरेवाडी( ता. पन्हाळा) बाबू पार्क कॉलनी येथील प्रियंका रणजीत पाटील (वय३१) यांनी मंगळवारी(दि१०) रोजी  राहत्या घरी गळफास  घेऊन आत्महत्या केली असून पती ,सासू,सासरे, दीर,जाऊ, आणि नणंद यांच्या विरोधात वडील सुनील वसंतराव पवार यांनी फिर्याद नोंदवली असून कोडोली पोलिसात गुन्हा दाखल झाला.


माहेरहून शुगर फॅक्टरी च्या खरेदीसाठी पहिले ५ लाख रुपये देऊनही आणखीन ५ लाख रुपये घेऊन ये तू मेलीस तरी आम्हाला काही फरक पडणार नाही असे म्हणून घरातील किरकोळ कारणावरून घरचे सर्व नातेवाईक प्रियांका पाटील हिला वारंवार शिवीगाळ व मारहाण करून जाचक त्रास  जात होते. या त्यांच्या सततच्या जाचक त्रासाला कंटाळून माझी मुलगी प्रियांका हिने आज मंगळवार( दि १०)रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या  सुमारास राहते घरातील माडीवरील बेडरूम मधील फॅनला साडी ने गळफास घेऊन आत्महत्या केली.मयत प्रियंका पाटील यांना दोन मुली आहेत. हुंडाबळी कायद्याअंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत प्रियंकाचे पती- रणजीत सुभाष पाटील, सासरे -सुभाष हिंदुराव पाटील ,सासू- शोभा सुभाष पाटील, दीर -विशाल सुभाष पाटील ,जाऊ- प्रज्ञा विशाल पाटील, ननंद -शितल चव्हाण यांच्या विरोधात मयत प्रियंका चे वडील सुनील वसंतराव पवार राहणार कुंडल, ता.पलूस ,जि.सांगली यांनी फिर्याद नोंदवली असून कोडोली पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पती रणजित पाटील, सासू शोभा पाटील, दीर विशाल पाटील आणि जाऊ प्रज्ञा पाटील यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.