सांगलीतील शामराव नगर चौक म्हसोबा मंदिर समोर गटर नागरिकांसाठी बनली धोकादायक.
सांगलीतील शामराव नगर चौक म्हसोबा मंदिर समोर गटर नागरिकांसाठी बनली धोकादायक.
----------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
----------------------------------
सांगलीतील शामराव नगर मार्गावरील म्हसोबा मंदिर समोर काही दिवसापूर्वी देण्याची पाईप बसविली होती त्यानंतर ड्रेनेज विभागाने भले मोठे गटर असे अर्धवट उघड्यावर सोडून नागरिकांसाठी धोका निर्माण केलाय. सदर गटारी भोवती कोणता दिग्दर्शक फलक लावला नाही. गटारीवरील झाकण सुद्धा बसवले नाही. उद्या जर मोठी घटना घडली तर त्याला जबाबदार महानगरपालिकेचा ड्रेनेज विभाग असेल अनेक ते अधिकारीच असतील.
नागरिकांचा या धोकादायक गटारीमध्ये बळी गेल्यावर महानगरपालिका ड्रेनेज विभाग जागा होणार का?
असा आमचा लोकहित मंच सवाल करत आहे.
असे उघड्यावर गटारी वरती झाकण न बसवण्याचे कारण काय?
सदर मार्गावरती मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि वाहनांची एजा असते. तरी याची काळजी महानगरपालिकेने का घेतली नाही ?
असे उघड्यावरती गटारीला झाकण का बसवले नाही . सदर गटारे वरती लवकरात लवकर झाकण बसवावे अन्यथा लोकहित मंच सांगलीच्या वतीने ते सर्व खर्चाने बसवण्यात येईल असा इशारा लोक हित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment