लोखंडी रॉड डोक्यात घातल्याने एक जण गंभीर जखमी.

 लोखंडी रॉड डोक्यात घातल्याने एक जण गंभीर जखमी.

-----------------------------

शिरोळ प्रतिनिधी.

-----------------------------

शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे राहणारा विजय जाधव हा कामानिमित्त इचलकरंजी येथे आपल्या मामाकडे वास्तव्यास आहे .सोमवारी कामावरून घरी जाताना डेक्कन मिल परिसरात पंचगंगा साखर कारखान्याच्या कमानीजवळ तो पोहोचला, त्यावेळी त्याठिकाणी असणाऱ्या छोट्या टेम्पोच्या चालकाने जाधव यांना अडवून शिवीगाळ केली त्या दोघांच्यातवाद निर्माण झाला यावेळी संशियताने जाधव यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला त्यामध्ये जाधव हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी इचलकरंजी येथे  शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी घटना स्थळी मोठ्या प्रमाणात नागरिक गोळा झाले त्यावेळी हल्ले खोरांनी घटनास्थळावरून पळ काढला सदर घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.