सांगवडे गावातील घरातील व सार्वजनिक गणपती बाप्पाला निरोप.

 सांगवडे गावातील घरातील व सार्वजनिक गणपती बाप्पाला निरोप.

_______________________

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

सांगवडे प्रतिनिधी

विजय कांबळे

_________________________


सांगवडे प्रतिनिधी :- सांगवडे गावातील घरातील व सार्वजनिक गणपती बाप्पाला निरोप. गावातील सार्वजनिक गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकी साठी मंडळाने आणलेले डॉल्बी, झांज पथक, नाशिक बाजा, हलगी घुमक ह्या वाध्यांमुळे सांगवडे गावातील भक्त मंडळी व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामध्ये सांगवडे गावचे आराध्य दैवत असलेले श्री नृसिंह यांनी हिरण्यकश्यपू यााचा वध केलेला देखावा राधेय स्पोर्ट्स ने केला होता. या देखाव्याने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले व तो देखावा गावातील पूर्ण मिरवणुकीत खास आकर्षण बनला.

     तसेच या मंडळाने दोन दिवस दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सलग दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. 

तसेच दरवर्षी प्रमाणे सर्व मंडळामार्फत महाप्रसादाचे आयोजन केले होते. महाप्रसादाचा भक्तानी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. 

सामाजिक बांधिलकी जोपासत ध्वनी प्रदुषण न करता शासनाच्या नियमा नुसार सर्व मंडळांनी मिरवणूक शांततेत पार पाडली व गणपती बाप्पांचा निरोप घेतला.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.