नगर परिषद संकुलातील व्यापारी त्रस्त पावसाच्या पाण्यामुळे वारंवार पाणी साचते.
नगर परिषद संकुलातील व्यापारी त्रस्त पावसाच्या पाण्यामुळे वारंवार पाणी साचते.
-------------------------------
रिसोड/ प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-------------------------------
अनेक निवेदन देऊनही नगर परिषदेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष..
मागील 15 वर्षापासून पाण्याचे गटार साचण्याची अडचण सर्व व्यापाऱ्यांना होत आहे याआधी कधी जास्त असा विषय केला नाही पण ही अडचण खूप जास्त प्रमाणात वाढत असल्या कारणाने याला काहीतरी तोडगा काढण्यात यावा याकरिता नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे पाणी बाहेर काढण्याचा जुनी नगरपरिषद कॉम्प्लेक्स मधील व्यापारी मंडळी नियोजन करतात पण त्यांना समोरील अतिक्रमातील लोक हे नगरपरिषद कॉम्प्लेक्स मधील व्यापारी मंडळी सोबत भांडण व शिवीगाळ करतात व कॉम्प्लेक्स वरील व्यापारी हे काही मदत करत नाहीत उलट जास्तीचा कचरा खाली गड्ड्यात करतात त्यांच्यावरील पाणी हे डायरेक्ट खाली सोडतात त्यांच्या पाण्याचा प्रवाह हा बाहेर नसून हा खाली तळघरात मध्येच सोडलेला दिसतो.
नगरपरिषद कॉम्प्लेक्स समोरील अतिक्रमणातील दुकान हे खूप प्रमाणात वाढले व यांच्या वाढल्यामुळे खालील गड्ड्यातील कॉम्प्लेक्स व दुकान हे काहीच दिसत नाही याचा नगरपरिषद कॉम्प्लेक्स मधील व्यापारी मंडळीं सर्वांवर खूप परिणाम होत आहे अजून त्यांचे आर्थिक नुकसानी होतात त्यात पाण्याची भर पडली आणि तळघरातील कोबा हा खूप जीर्ण झाला आणि झर्याच्या पाण्यात वाढ झालेली दिसते
याआधीही या विषयावर नगरपरिषदांना विनंती केलेली आहे निवेदन देऊन यावर अजूनही तोडगा निघालेला नाही या कारणाने सर्व व्यापारी बंधू मच्छी पालनाचा व्यवसाय सुरू करू असे म्हटले व
सर्व व्यापारी मंडळींनी निवेदनात मच्छी पालन करण्याची परवानगी मागितली .यावेळी अजय कानडे,शंकर राऊत, महावीर उखळकर, आवेज शेख, युसुफ शेख, प्रदीप वाकोडे, अनिल कानडे, आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment