तिट्ट्यावरील करणी'ची पोलखोल अंधश्रद्धा नको विज्ञानवाद स्वीकारा : डॉ. एम.एस. पवार.

 तिट्ट्यावरील करणी'ची पोलखोल अंधश्रद्धा नको विज्ञानवाद स्वीकारा : डॉ. एम.एस. पवार.

-------------------------------

चंदगड प्रतिनिधी

आशिष पाटील 

-------------------------------

       कोवाड ( चंदगड ): समाज शिक्षित होऊनही आज गावागावातील वेशीवर करणी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामळे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाडच्या एन.एस.एस. विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. एम.एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 'तिट्ट्यावरील करणी' हा कार्यक्रम घेण्यात आला.


प्रा. डॉ.आर.डी. कांबळे यांनी प्रास्ताविक करुन विद्यार्थानी वास्तववादी जीवन जगण्याचे अवाहन केले. प्रकल्प अधिकारी प्रा. दीपक पाटील यांनी 'तिट्टयावरील करणी'च्या बुट्टीतील नारळ, लिंबू, केळी, बिबा काढून विद्यार्थांना दाखवत या पाठीमागिल अंद्धश्रद्धेचे स्पष्टीकरण केले. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज गावच्या वेशीवर अमावस्या, पौर्णिमेला हे असे नारळ, लिंबू आणि कोंबडे टाकतात. संत गाडगेबाबांची शिकवन आज आपण विसरत असून आज व्हीआयपी बुवा, बाबा सगळीकडे तयार होत आहेत. दुर्दैवाने त्यांच्या विचारांचा प्रसार होऊन लोक करणी, भानामतीसारखे प्रकार करत आहेत. विद्यार्थ्यांनी यापासून वेळीच थांबले पाहिजे असे अवाहन त्यांनी केले.


यावेळी प्रा.सी.ए. कणसे यानी विद्यार्थांच्या शंकाना उत्तरे देऊन त्या दुर करण्यासाठी विज्ञानाची गरज अधोरेखित केली. दुंडगे कोवाड तेऊरवाडी तिट्ट्यावर  शिक्षक विद्यार्थी यानी अमावस्येचा करणीचा पंचनाम केला. कार्यक्रमाचे नियोजन  प्रा संदीप मुंगारे, प्रा.संदीप पाटील, यानी केले. यावेळी प्रा.आर.टी. पाटील, अजित व्हन्याळकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.