कोल्हापूर जिल्ह्याचा कमी वेळेत इतका विकास, स्वच्छता होणार असेल तर ताई,दादा तुम्ही महिन्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर या?

 कोल्हापूर जिल्ह्याचा कमी वेळेत इतका विकास, स्वच्छता होणार असेल तर ताई,दादा तुम्ही महिन्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर या?

------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

भारत देशाच्या राष्ट्रपती उद्या कोल्हापूर जिल्हा दौरावर येत आहेत, या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगर पालिकेच्या वतीने शहरात युद्धपातळीवर कामाची मोहीम हाती घेण्यात आली आहे ,तर बऱ्याच ठिकाणी शासकीय यंत्रणेच्या वतीने रात्रभर पॅचवर्क आणि डांबरीकरणाचे काम सुरू असून, देशाच्या राष्ट्रपती उद्या वारणानगर दौऱ्यावर येत असून त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात रस्ते कामे, परिसरातील स्वच्छतेची कामे शासनाच्या वतीने करण्यात येत आहेत.

        अशा पद्धतीची कामे जर राष्ट्रपती दौऱ्यांनी होणार असतील तर राष्ट्रपतींच्या सहित केंद्रीय मंत्रिमंडळातल्या नेत्यांची दौरे वारंवार कोल्हापूर जिल्ह्यात व्हावेत, त्यापैकी बरेचसे दैरे हे ग्रामीण भागात असावेत, जेणेकरून बड्या नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते व स्वच्छता मोठ्या प्रमाणात होऊन सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील व मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रोगराईला कुठेतरी आळा बसेल अशा आशयाची चर्चा सध्या ग्रामीण भागात रंगत असून. शासन एखाद्या राष्ट्रीय व्यक्तीच्या व केंद्रीय मंत्रिमंडळाच्या स्वागतासाठी दिवसाचे रात्र करून मोठ्या प्रमाणात रस्ते गटर्स स्वच्छतेची कामे करतात परिणामी हीच कामे इतर वेळी का केली जात नाहीत ?असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून निर्माण होत असून, इतर वेळी पैसा, फंड कर्मचारी व शासनाची मंजुरी नसल्याचे माहिती सांगितली जाते. परंतु अशा दौऱ्याच्या वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात माणसे फंड येतो तरी कुठून अशा चर्चा सध्या ग्रामीण भागात जोर धरत आहे. 

        परिणामी सध्या ग्रामीण भागात पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणावर पूरग्रस्त परिस्थिती मुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वच्छता करणे गरजेचे असून या अस्वच्छतेमुळे ग्रामीण भागात सध्या डेंगू सारख्या रोगांनी थैमान घातले असून ग्रामीण भागात प्रत्येक गावामध्ये 100 पेक्षा जास्त डेंगूचे रुग्ण असल्याची आढळत आहेत. परिणामी या ठिकाणी शासनाचे दुर्लक्ष असून, डेंगू सदृश्य गावात औषध फवारणी साठी सुद्धा शासनाकडे फंड नसल्याची माहिती मिळत आहे. केवळ राष्ट्रीय नेते पदाधिकारी यांच्या स्वागतासाठी मात्र शासन लागेल ते प्रयत्न करत असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील दररोजच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणाऱ्या मुला मुलींच्या प्रवासासाठी एसटी बसेस उपलब्ध नाहीत परंतु एखाद्या नेत्याच्या दौऱ्यासाठी किंवा एखाद्या राज्याच्या किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातल्या नेत्याच्या दौऱ्यासाठी लागले तेवढ्या प्रमाणात एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या जातात ही या जिल्ह्याची शोकांतिका आहे. परिणामी केंद्रीय नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना वेळ मिळाला तर जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीतील जी गावे पाण्याखाली गेली त्या गावांची सध्या असलेली अवस्था त्या परिसरातील शेतीचे झालेले नुकसान रस्ते गटर्स व रोगराई याची वेळात वेळ काढून पाहणी करावी, व जे प्रशासन आपल्या उपस्थितीसाठी दिवसाची रात्र करून पळापळ करत आहेत .त्या प्रशासनाला कुठेतरी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी जागरूक रहाण्याचे आदेश द्यावेत अशी ही मागणी सर्वसामान्य नागरिकांतून सध्या जोर धरत आहे.

           परिणामी पदाधिकारी व राष्ट्रीय नेत्यांच्या दौऱ्यावरती खर्च करण्यास ग्रामीण भागाचा कोणताही विरोध नाही परंतु कुठेतरी दहा टक्के का होईना स्वच्छता व रस्त्यांची दुरावस्था , ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची वाहतुकीची सोय, शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी आवश्यक असणारे पाणंद रस्ते, यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागाला शासनाने कुठेतरी हातभार लावून विकास करावा अशी चर्चा सध्या ग्रामीण भागात जोर धरत आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.